बदनापूर । वार्ताहर
महाराष्ट्रात वाढत असलेले महिलांवरील अत्याचाराला पायबंद करण्यास महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरत असल्यामुळे भाजपच्या महिला आघाडीच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येत होते. बदनापूरमध्येही भाजप महिला आघाडीच्या वतीने आघाडी सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करून तहसीलदारांरा निवेदन सादर करण्यात आले. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात सुरक्षिततेचा प्रश्‍न अतिगंभीर होत चालला आहे.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बलात्कार, अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरू आहे त्यातच कोरोना महामारीसारख्या अतिसंवदेनशिल काळातही कोवीड सेंटरमध्ये व हॉस्पिटलमध्ये अत्याचार व विनयभंगाचे सत्रही सुरूच आहे. भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून सर्व घटकांचा प्रत्यक्ष पाठपुरावा केला आहे. त्यानंतरही आघाडी सरकारने या प्रकरणी गांभीर्य दाखवले नसल्याने त्यांना जागे करण्यासाठी आंदोलन करण्यात आले असल्याचे या वेळी निवेदनाद्वारे कळवण्यात आले. या निवेदनावर आ. नारायण कुचे व महिला आघाडीच्या बदनापूर तालुकाध्यक्ष रेणुका कोल्हे, शितल मात्रे, उषा तोडावत, अंजली मुंडलिक, द्वारकाबाई घुगे, सुनिता कोल्हे, सुनिता कोलते, गिता भगवान मात्रे, स्वाती मगरे, नंदा गारखेडे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.