कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत 6 उपकेंद्रा अंतर्गत 41 टिमच्या माध्यमातुन ता.15 मंगळवार रोजी आरोग्य विभागाकडून माझे कुटुंब माझी जबाबदारी या आरोग्य मोहिमेचे उद्घाटन कुंभार पिंपळगाव येथे पंचायत समिती सभापती भागवतराव रक्ताटे यांच्या हस्ते तर गुंज येथे शिक्षण व आरोग्य माजी सभापती रघुनाथ तौर यांच्या करण्यात आले कोरोना च्या वाढत्या संसर्गाला आता संपूर्ण घनसावंगी तालुका कोरोणा मुक्त करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने माझे कुटुंब माझी जबाबदारी या महा विकास आघाडी सरकारच्या आरोग्य मोहिमेला सहकार्य करावे असे आव्हान सभापती भागवतराव रक्ताटे व रघुनाथ तौर यांनी केले आहे.
यावेळी येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एस बी ढवळे व डॉ.शिवशंकर उंमरे राजाटाकळी यांनी मार्ग दर्शन केले.या मोहिमेत कोरोना नियंत्रणासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या राज्यव्यापी मोहिमेतून आरोग्य स्वयंसेवक यांच्या सेवेतील प्रत्येक कुटुंबांपर्यंत गृहभेटीत या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येकाची 2 प्राणवायू पातळी, शारीरिक तापमान तपासल्या जाणार आहेत. नागरिकांनी वारंवार हात धुणे सुरक्षित अंतर सातत्याने राखणे अशा विविध मार्गदर्शक सूचना नागरिकांच्या रोज दैनंदिन जीवनात सहजपणे समावेश होण्यासाठी थेट संपर्क करून जनजागृती करणे हाच या मोहिमेचा उद्देश आहे कुंभार पिंपळगाव, राजाटाकळी, गुज देवी दहेगाव ,जांब समर्थ, पिंपरखेड आदि गावातुन या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला असून नागरिकांकडून या मोहिमेस प्रतिसाद मिळत असून आरोग्य विभागाकडून या मोहिमेत कडेकोट नियमाचे पालन करण्यात येत आहे या मोहिमेत आरोग्य सेवक, आशा स्वयम सेविका ,अंगणवाडी सेविका यांचा सहभाग असून पहिली ङ्गेरी 15 सप्टेंबर ते त 10 ऑक्टोंबर राहील दुसरी ङ्गेरी 12 ऑक्टोंबर 24 ऑक्टोंबर राहील असे 34 दिवसच हि मोहिमेत राबविण्यात येणार आहे पालक मंत्री यांच्या मार्गदर्शनानुसार या राबवले जाणार. या मोहिमेत सार्वजनिक आरोग्य विभाग ,नगर विकास, ग्रामविकास महिला बालकल्याण आदींसह वैयक्तिक सहभाग घेता येईल ग्रामपंचायतीसाठी बक्षीस योजना असेल वैयक्तिक बक्षीस योजनाही या मोहिमे ठेवण्यात आली आहे.
Leave a comment