मंठा । वार्ताहर
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जालना जिल्हा दौर्यावर असताना शालेय शिक्षणमंत्री ना.वर्षाताई गायकवाड यांचा मंठा येथे सत्कार करून निवेदन देण्यात आले. जालना जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबीत प्रश्नासंदर्भात यावेळी निवेदन देवून चर्चा करण्यात आली. यावेळी मंठा शिक्षण विभागात अस्थापना मंजुर करणे, अप्रशिक्षीत शिक्षण सेवकांचा प्रथम नेमणूक दिनांक ग्राह्य धरून चट्टोपाध्यायव निवड श्रेणीचा लाभ देणे, दि.01 नोव्हेंबर 2005 नंतरच्या शिक्षकांना जूनी पेन्शनयोजना लागू करणे, जिल्ह्यातील शिक्षक प्रवर्गातून विविध पदे पदोन्नतीने तातडीने भरणे, शाळांचे वीजबील ग्राम पंचायत स्तरावरून भरण्यात यावे इत्यादी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
यावेळी शिवाजीराव देशमुख, के.जी.राठोड, मुक्तार अन्सारी, संजय वाघमारे, प्रमोद देशमुख, संतोष विरकर, भाऊसाहेब जाधव, रामा चव्हाळ, बी.एम.गायकवाड, आर.एस.बोराडे, व्ही.एन.यादव, जी. व्ही. चिकाळकर, ए.आर.शेख, बी. के. बोराडे, शे.एजास, परमेश्वर पांढरे, रमेश विश्रूप, डी.व्ही.खुडे यांच्यासह संघाचे शिक्षक उपस्थित होते.
Leave a comment