जालना । वार्ताहर
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त दि. 17 सप्टेंबर, 2020 रोजी सकाळी 9-00 वाजता राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते टाऊन हॉल, जुना जालना येथे मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते सकाळी 8-00 वाजता ध्वजारोहण होणार आहे.
सद्यस्थितीत कोविड-19 रोगाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना हा कार्यक्रम पहाता यावा यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, जालना या फेसबुक अकाऊंटवरुन या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
Leave a comment