दंड न भरल्यास तीन महिन्याची शिक्षा
भोकरदन । वार्ताहर
जमील अहमद कादरी यांनी सन 2010 मध्ये शेख रशीद उर्ङ्ग लइक यांना कपड्याच्या व्यवसाय करण्या साठी 70 हज़ार रूपये रोख दिले होते त्या वेळी शेख रशीद यांनी 16 डिसेंबर 2010 रोजी 70 हजार रुयाचा जालना मर्चेन्ट बँक शाखा भोकरदन चा धनादेश दिला होता परंतु त्या खात्यात रक्कम नसल्याने धनादेश बाउंस झाला होता त्या नंतर जमील कादरी यांनी धनादेश अधिनियम कलम 138 च्या आधारे ङ्गौजदारी न्यायालयात दि. 18 जानेवारी 2011 रोजी ङ्गिर्याद दाखल केली, व या बाबत न्यायलयात तीन जनाची साक्ष झाली.
या वेळी दोनही वकिलांनी आप आपल्या अशीलाची बाजू मांडली सर्व बाजू ङ्गौजदारी न्यायधीश बी एस जगदाळे यांनी जाणून घेतल्या व आरोपी शेख रशीद यांना 255(2) कलम नुसार दोषी ठरवून कलम 357 (3) नुसार धनादेशची रक्कम दुप्पट देण्याचे आदेश दिले असून ङ्गिर्यादी शेख राशिद यांना एक लाख 40 हज़ार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत,हि रक्कम देण्यास 30 दिवसाचा कालावधी देण्यात आला असून जर हि रक्कम वेळेत न दिल्यास तीन महिन्याची शिक्षा सुनावली आहे य प्रकरणात वकील शेख वसीम यांनी काम पाहिले.
Leave a comment