नाट्यांकुरतर्ङ्गे आशीष रसाळ यांचा सत्कार
जालना । वार्ताहर
निसर्गाची दुष्टचक्रे, मानव विकास निर्देशांकात शेवटच्या रांगेत असलेल्या जालना जिल्ह्यात वैचारिक व सांस्कृतिक चळवळ मोठ्या प्रमाणात असून युवा वक्ते आशीष रसाळ यांच्या राज्य पातळीवरील निवडीने महाराष्ट्रात जालन्यातील वैचारिक चळवळ अधोरेखित झाली. असे प्रतिपादन नाट्यांकुर बालनाट्य संस्थेचे सचिव सुंदर कुँवरपुरियाँ यांनी येथे बोलतांना केले. महाराष्ट्र वक्तृत्व परिषद मार्गदर्शक समिती च्या राज्य कार्यकारिणी प्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल नाट्यांकुर चे प्रकल्प प्रमुख आशीष रसाळ यांचा आज नाट्यांकुर च्या वतीने सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी सुंदर कुँवरपुरियाँ बोलत होते. अध्यक्ष ध.स. जैन, प्रकल्प प्रमुख जयेश पहाडे, शाम जवादे यांची उपस्थिती होती. सुंदर कुँवरपुरियाँ यांनी वक्तृत्व,वाद क्षेत्रात नवीन पिढीला योग्य दिशा मिळण्यासाठी आशीष रसाळ यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल असा विश्वास सुंदर कुँवरपुरियाँ यांनी व्यक्त केला. ध.स. जैन यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राज्य पातळीवरील जवाबदारी आली असली तरी नाट्यांकुर चे कार्य जोमाने सुरू राहील असे सत्कार मुर्ती आशीष रसाळ यांनी सांगितले. सुञसंचालन व आभार प्रदर्शन जयेश पहाडे यांनी केले.
Leave a comment