माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती
जालना । वार्ताहर
कोरोना प्रादुर्भावाचा मुकाबला करताना संघटन हीच सेवा या उपक्रमा अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने संपूर्ण राज्यभरात सेवाकार्य केले जाणार असून महात्मा गांधी यांची जयंती पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आणि जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या जन्मदिवसा निमित्त सत्तर दिव्यांगांना कृत्रिम अवयव किंवा उपकरणे प्रदान करणे, गरजूंना चष्म्याची वाटप करणे गरीब वस्त्यांमध्ये आणि रुग्णालय मध्ये असणार्या रुग्णांना कोरोना प्रादुर्भावाचा च्या सर्व नियमांचे पालन करून फळांचे वाटप करणे स्थानिक गरजेनुसार आणि रुग्णालयाच्या माध्यमातून ला समाधान करणे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करणे प्रत्येक बुथवर वृक्षलागवड करणे व त्यातून पर्यावरणात आरक्षणाचा संकल्प करणे स्वच्छता अभियान राबवणे प्लास्टिक मुक्तीचा संकल्प करणे इत्यादी बाबींचा समावेश असणार आहे असेही यावेळी लोणीकर यांनी प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले.
व्हर्च्युअल कॉन्फरन्सच्या माध्यमातून बुद्धिजीवी नागरिकांना संबोधित करण्यासाठी प्रदेश पातळीवरील वक्ते मार्गदर्शन करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या विषयी 70 स्लाईड चे प्रदर्शन सोशल मीडिया मार्फत प्रसारित करण्यात येणार आहे असे देखील यावेळी लोणीकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 25 सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती असून भारतीय जनता पार्टी ला विचारधारा प्रदान करणार्या पंडितजींच्या जयंतीचा उपक्रम जिल्ह्यातील प्रत्येक बुथवर केला जाणार आहे यावेळी सर्व बुथ प्रमुख आपल्या निवासस्थानावर पक्षाचा ध्वज देखील लावणार आहेत असेही लोणीकर यांनी यावेळी प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले. 25 सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत माननीय पंतप्रधान यांचा आत्मनिर्भर भारताचा संकल्प विविध प्रकारच्या संवादाच्या कार्यक्रमातून जनतेपर्यंत पोहोचविला जाणार असून खादी चा उपयोग आणि स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणार्या अभियानाचा प्रचार आणि प्रसार यानिमित्त केला जाणार आहे आत्मनिर्भर भारत पॅकेजच्या विविध योजनांचा भूत स्तरापर्यंत प्रचार आणि प्रसार करण्यात यावा यासाठी देखील यानिमित्ताने प्रयत्न केला जाणार आहे यावेळी विविध योजनांची संबंधित तज्ज्ञांचं मार्गदर्शन देखील पक्ष कार्यकर्त्यांना उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
कोरोना प्रादुर्भाव काळात काळजी घ्या-लोणीकर
सेवा सप्ताह निमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये पक्षाचे सर्व खासदार आमदार सर्व लोकप्रतिनिधी पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी होणार असून सर्वांनी कोरोना प्रादुर्भावाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावे असेही आवाहन लोणीकर यांनी प्रसिद्धीपत्रकात केले आहे
Leave a comment