राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारही तेवढेच जबाबदार-मराठा क्रांती मोर्चा
बदनापुर । वार्ताहर
मराठा आरक्षणा संदर्भात रविवारी दिनांक 15 रोजी चाणक्य मंगल कार्यालय औरंगाबाद जालना रोड येथे 12 वाजता बदनापुर तालुका मराठा क्रांती मोर्चा बैठक पार पडली. आरक्षणाबाबत न्यायालयाने दिलेल्या स्थगितीचा निकाल झाल्यानंतर मराठा बांधवांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या व पुढील दिशा ठरवण्याची भूमिका बदनापुर तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या या बैठकीत घेण्यात आलेल्या आहेत. त्याच वेळी राज्य शासनासह केंद्र सरकारचा ही निषेध नोंदविण्यात आला असून अन्याय झाला तर संघर्ष हा राज्य व केंद्र सरकार विरोधात उभा करणार शांत असलेले मोर्चे हे आक्रमक होण्याची वाट सरकारने बघू नये . त्वरीत निर्णय न घेतल्यास राज्य व केंद्र सरकारच्या मंत्र्यांना ङ्गिरू देणार नाही असा सज्जड इशाराही मराठा समन्वयक पंकज जर्हाड यांनी या बैठकीद्वारे दिला आहे.
9 सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाज बांधवांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहेत राज्य शासनासह केंद्र सरकार जबाबदार असून मराठा समाज बांधवांकडून या दोघांचाही निषेध नोंदवला गेला आहेत त्याच पार्श्वभूमीवर विचारविनिमय करत पुढील दिशा ठरवण्यासाठी मराठा समाज बांधवांची ही तातडीची बैठक झाली. या बैठकीमध्ये राजेश जर्हाड ,भरत भांदरगे, पांडुरंग जर्हाड, बद्री पठाडे, राहुल जर्हाड, गजानन वाळके, राजु थोरात, नंदु दाभाडे, विष्णु शिंदे नंदु शेळके आदींनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी न्यायालयाचा निर्णय येण्याआधीच आरक्षण विरोधी निर्णय घेतल्याने अशा मराठा विरोधी मंत्राच्या निषेध सर्वानुमते बदनापुर च्या बैठकीत करण्यात आला विधी विभागाचे आशुतोष कुंभकोणी मराठा आरक्षणाची बाजू न्यायालयात मांडण्यात असमर्थ ठरल्याने त्यांच्याविषयी हलगर्जीपणा बाबत त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणून त्यांना पदावरून दूर करावे ही देखील मागणी केली. त्याचबरोबर सरकारने मराठा आरक्षणा व्यतिरिक्त इतर ज्या मागण्या आहेत त्यामध्ये सारथी शिक्षण संस्था त्वरित सुरू करावी अण्णासाहेब पाटील महामंडळाची व्याप्ती वाढवून त्याला 500 कोटी निधीची तरतूद करावी चालू शैक्षणिक वर्षात मधील सर्व विद्यार्थ्यांची 50% ङ्गी राज्य सरकारने भरावी त्याचबरोबर नोकरीमध्ये ज्या तरुणांची आरक्षणाच्या धर्तीवर निवड व भरती झालेली आहे ही भरती विशेष भरती म्हणून सरकारने तिला मंजुरी द्यावी आधी विषय व ठराव या बैठकीत सर्व समाजाच्या वतीने मांडण्यात आले याला सर्वांनी एक मताने संमती दिली. यावेळी अर्जुन उढाण, बालाजी गारखेडे, राम सिरसाठ, राधाकिसन शिंदे, श्रीमंत जर्हाड, प्रविन पडुळ, योगेश कान्हेरे, कृष्णा कडोस, श्रीनिवास जर्हाड, आनंद शिंदे, स्वप्निल वाघ, नितिन जर्हाड, रवि नाईकवाडे, शक्ती तांबे, उदय काकडे, संतोष नागवे, योगेश जर्हाड, रवि मराठे, अक्षय जुंबड, गजानन लहाने, अर्जुन चव्हान, उद्धव ससेमहाल, कैलास दाभाडे, परमेश्वर जर्हाड यांच्यासह असंख्य मराठा बांधव बैठकीस उपस्थित होते.
Leave a comment