कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
कुंभार पिंपळगाव एक ग्रामीण शहर असून या ग्रामीण शहर परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे गावात कुत्री झुंडीच्या झुंडी ङ्गिरत असल्याने लहान लहान मुलांना बाहेर निघणे मुश्कील झाले आहे महिलांमध्येही भीतीचे वातावरण आहे यापूर्वी कुत्र्यांनी गावातील साठे नगर येथील शाळकरी मुलीला चावा घेतला होता तसेच गावात महिला सकाळी सडा टाकताना कुत्र्याने अचानक येऊन हल्ला करून चावा घेतला होता.
अशा विविध घटना घडलेल्या आहेत गल्ली मध्ये लहाण-लहान मुले खेळतात सध्या शाळा नसल्यांने गल्लो गल्ली बाहेर खेळणार्या मुलांची संख्या जास्त आहे. सध्या कुंभार पिंपळगावात दोन पिसाळलेली, आजाराने त्रस्त कुत्री सुसाट वेगेने पळतात व अचानक घरात कुठेही जाऊन बसताता महिला व खेळकर मुलांन मध्ये भिती वाटत असून गावकर्यांन मधून या मोकाट कुत्र्यावर बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
Leave a comment