मंठा । वार्ताहर
कोरोना विषाणू संक्रमणाचा मानवाने धसका घेतला असतानाच जनावरावर लम्पी आजार बळावला आहे. या आजारावर लस उपलब्ध नसल्यामुळे शेतकरी आणि पशुपालक धास्तावले आहेत. तालुक्यात 36 हजार 465 मोठे पशुधन तर 12 हजार 770 लहान पशुधन आहे. या आजाराचा प्रसार एका जनावरापासून दुसर्या जनावराला होत असून चावणाजया माशा, डास, गोचिड, कीटक यांच्यामुळे याचा प्रसार होतो.
या रोगामुळे जनावरांच्या मरतुकीचे प्रमाण नगण्य असले तरी, बाधित जनावरे अशक्त होत जातात. दूध उत्पादनात मोठी घट होऊन त्यांची कार्यक्षमता खालावते. काही वेळा बाधित जनावरांचा गर्भपात होत असून प्रजननक्षमतासुद्धा घटते. या रोगामुळे त्वचा खराब होत असल्याने जनावरे विकृत दिसतात. हा रोग झुनोटिक रोग प्रकारातील नसल्याने माणसांमध्ये याचा प्रादुर्भाव मुळीच होत नाही. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून न जाता आजार झाल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात भेट द्यावी.
Leave a comment