कोरोना काळात प्रभावी काम करणार्या कोरोना योध्यांचा लोणीकर यांच्या हस्ते सत्कार
जालना । वार्ताहर
तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यकाळात मराठा समाजाला 16 टक्के एस बी सी प्रवर्गात आरक्षण देण्यात आले होते त्याबाबत माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली तत्कालीन महाराष्ट्र सरकारच्या प्रचंड पाठपुराव्यामुळे उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या बाजूने निर्णय देऊन मराठ्यांना आरक्षण घोषित केले होते परंतु काही दळभद्री लोकांनी पुन्हा एकदा मराठ्यांच्या विरोधात कट कारस्थान करत सुप्रीम कोर्टात धाव घेतली त्याठिकाणी मराठा समाजाच्या वतीने बाजू मांडण्यासाठी विद्यमान महा विकास आघाडीचे सरकार पूर्णतः अपयशी ठरला असून सरकारने मराठा समाजाचा विश्वास घात केला असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी दिली. मराठा आरक्षणाच्या प्रगतीमुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून आरक्षणाच्या आधारावर नोकरी मिळालेल्या युवकांची नोकरी धोक्यात आली आहे सद्यस्थितीमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू असून आरक्षणावर आधारित प्रवेश प्रक्रियेमधून मराठा समाज वंचित राहणार आहे त्यासाठी अध्यादेश काढून मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीतील आरक्षणा मध्ये सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी देखील यावेळी लोणीकर यांनी केली.
मागील सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबत प्रयत्न केला होता परंतु तांत्रिक दृष्ट्या बाबा पूर्ण करता आली नाही म्हणून खास बाब म्हणून एसटी प्रवर्गाला दिल्या जाणार्या बहुतांश 22 सवलती धनगर समाजाला देण्यात याव्यात अशा प्रकारची व्यवस्था केली होती अगदी त्याच पद्धतीने महाराष्ट्र सरकारने देखील खास बाब म्हणून मराठा समाजाला आरक्षणाबाबत सुरक्षा प्रदान करण्यासाठी व्यवस्था करावी अशी मागणी देखील लोणीकर यांनी यावेळी केली. महा विकास आघाडी सरकारने मराठा समाजाला यांच्या पाठीत खंजीर खुपसला असून माननीय उच्च न्यायालयात देवेंद्र फडणवीस यांनी टीकवलेले आरक्षण सुप्रीम कोर्टात मात्र पाठ पुराव्याअभावी स्थगित झाले ही बाब प्रचंड निंदनीय असून मराठा समाजामध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे त्यासाठी खास बाब म्हणून अध्यादेश काढून मराठा आरक्षणाला सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी लोणीकर यांनी केली.
कोरोना प्रादुर्भाव काळात प्रभावी काम करणार्या कार्यकर्त्यांचा लोणीकर यांच्या हस्ते सत्कार
कोरोना प्रादुर्भाव काळात रक्तदान शिबिर फूड पॅकेटचे वाटप शेतकर्यांसाठी बँकेसमोर आंदोलन दूध उत्पादक शेतकर्यांसाठी दुधाचे आंदोलन मंदिरांच्या साठी घंटानाद आंदोलन सोयाबीन बियाणे प्रकरणी शेतकर्यांना 50 हजार रुपये हेक्टरी मदत करावी अशी मागणी करत लोणीकर यांनी यावेळी हेक्टरी 50 हजार रुपये मदत ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीच मागणी आहे याची यावेळी आठवण करून दिली विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तर हेक्टरी एक लाख रुपये मदत करावी अशी मागणी केली होती. हेक्टरी पन्नास हजाराची मागणी करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एक लाखाची मागणी करणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दोघेही आज आज सरकारमध्ये आहेत त्यांनी किमान त्यांचीच मागणी तरी पूर्ण करावी* असेही लोणीकर यावेळी म्हणाले अशा विविध आंदोलनांच्या माध्यमातून सरकारला जाग करण्याचा प्रयत्न करणार्या कोरोणा योद्ध्यांना सन्मानित करण्यात आले कोरूना काळात अनेक कार्यकर्त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सामाजिक भान राखत प्रचंड मेहनतीने समाज कार्यात हातभार लावला व अनेकांनी सहकार्याची भावना डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाला मदत करण्याचा प्रयत्न केला त्यातील ठळक कार्यकर्त्यांचा यावेळी लोणीकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला त्यामध्ये सुनील आर्दड वीरेंद्र धोका ह भ प रमेश महाराज वाघ कमलताई तुले जिजाबाई जाधव ज्ञानेश्वर शेजुळ प्रकाश टकले सर्जेराव जाधव अंकुश बोबडे संजय तौर कैलास शेळके सुजित जोगस, प्रा सहदेव मोरे पाटील, श्यामसुंदर शिंदे योगेश ढोणे नामदेव घेंबड विलास भुतेकर एकनाथ भुबर संजय काळे शर्मिष्ठा कुलकर्णी, मधु दंडारे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती
भाजपतर्फे आज तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे मराठा समाजाचे प्रचंड नुकसान झाले असून ते नुकसान वाचण्यासाठी खास बाब म्हणून मराठा समाजाला सर्व शैक्षणिक आणि नोकरीत सुविधा मिळाव्यात यासाठी तात्काळ अध्यादेश काढण्यात यावा याबाबत आज दिनांक 14 सप्टेंबर रोजी जालना मंठा परतुर व घनसावंगी या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती देखील यावेळी लोणीकर यांनी दिली
Leave a comment