जालना । वार्ताहर
समाजाच्या जडणघडणीत शिककाची भुमिका महत्वाची असते. त्यात जर समाज वंचीत व अल्पसंख्यांक असेलतर त्याला जास्त महत्त्व प्राप्त होते. असेच जालना तालुक्यातील पिरपिंपळगाव येथे कार्यरत शिक्षिका श्रीमती हिना कौसर त्यातील एक हाडाची शिक्षिका, समाजातील मुलांविषयी अत्यंत जिव्हाळा. मुलांनी शिकले पाहिजे आणि समाजातील अंधकार दुर करावा ही मनापासुन इच्छा. त्यात ऊर्दू माध्यम असल्यामुळे समाजाचे आपल्याला देणे आहे ही भावना असते . त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याचा नेहमी ध्यास घेतलेला असतो. याचीच दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आणि त्यांना जिल्ह्यातील मनाचा पुरस्कार आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर केला.
Leave a comment