जालना । वार्ताहर
जालना जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्वाची बैठक राज्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थित दि.17 सप्टेंबर 2020 गुरुवार रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह टाऊन हॉल जुना जालना येथे दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आली असून, याप्रसंगी मंत्री श्रीमती गायकवाड व आमदार कैलास गोरंट्याल यांचा विशेष सत्कार करण्यात येणार असल्याचे जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी सांगीतले आहे.
शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड ह्या पहिल्यांदा जालना शहरात येत आहे. आमदार कैलास गोरंट्याल यांनी जालना येथे मेडीकल कॉलेज व वैद्यकीय प्रवेशासाठी 70/30 चा कोटा रद्द करण्यासाठी घेतलेली आग्रहाची भूमिकेबद्दल त्यांचा विशेष सत्काराचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. याप्रसंगी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी तालुकाध्यक्ष आजी माजी जि.प. व पं.स.सदस्य नगरसेवक प्रदेश पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आवर्जुन उपस्थित राहावे असे आवाहन आमदार राजेश राठोड, माजी आमदार सुरेशकुमार जेथलीया, नगराध्यक्षा संगीताताई गोरंट्याल, जिल्हाकार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहराध्यक्ष शेख महेमूद गटनेते गणेश राऊत, जिल्हाउपाध्यक्ष विजय चौधरी, राम सावंत, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, जिल्हाध्यक्ष विमलताई देशमुख, राहुल देशमुख, बदर चाऊस, विजय जर्हाड, दिनकर घेवंदे, आनंद लोखंडे, शेख शमशू, चंदाताई भांगडीया आदिंनी केले आहे.
Leave a comment