अंबड । वार्ताहर
भारतीय जनता पार्टी व पक्षाच्या संलग्न संघटनेत वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ङ्गेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाच्या नवनिर्वाचित पदाधिकार्यांनी आता पक्षाचे काम तळागाळापर्यंत पोहोचववितांनाच समाजाच्या प्रत्येक घटकांच्या आणि विशेषत: शासकीय योजनांपासून दूर असलेल्या जनतेची कामे मार्गी लावावीत, असे आवाहन अंबडचे माजी आमदार तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते अॅड. विलासबापू खरात यांनी केले आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या मान्यतेनुसार व माजी प्रदेशाध्यक्ष केंद्रीय मंत्री रावसाहेब पा. दानवे, जिल्हाध्यक्ष आ.संतोष पा. दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली रामेशवर भांदरगे यांची निमंत्रित सदस्य म्हणुन तर जालना ग्रामीण तालुका कार्यकारणीमध्ये घनसावंगी विधानसभा मतदार संघातील नामदेवराव ढाकणे यांची किसान मोर्चाच्या अध्यक्षपदी, गणेशराव जाधव यांची भाजपा ट्रान्सपोर्ट सेल ता अध्यक्ष, अॅड. दशरथ शिराळे यांची कायदा सेल, परिक्षीत शिंदे भाजपा व्यापार आघाडी संयोजक, श्री अशोकराव पवार भाजपा आर्थिक ङ्गायनान्स सेल तालुकाध्यक्षपदी, मुकुंदराव मुंढे यांची ङ्गादर बॉडी तालुका उपाध्यक्ष, श्री सुनिलराव चौधरी यांची ङ्गादर बॉडी तालुका उपाध्यक्ष, राधाकिसन काटे ङ्गादर बॉडी तालुका उपाध्यक्ष, मकरंदराव बोकन यांची सरचिटणीस तर अनिरस मस्के चिटणीस, डॉ. विलासराव भुतेकर चिटणीस यांची तर सदस्यपदी कैलासराव काळे, राम आटोळे, राजीव खांडेभराड, बबन जाधव, बळीराम खलसे, सिताराम पिंगळे, दत्ता बकाळ, राजीव काळे, किशोर पाखरे, एकनाथ भुंबर या नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे अभिनंदन करुन अॅड. खरात म्हणाले की, पक्ष संघटनेत काम करणार्यांचा निश्चितच सन्मान होतो. परंतू त्यासाठी योग्य वेळ यावी लागते. नूतन पदाधिकार्यांच्या कामाचा गौरव म्हणूनच पक्षाने त्यांना ही जबाबदारी दिलेली आहे. आता आपल्याला मिळालेला पदाचा वापर हा पक्षाबरोबरच गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी करावा, असे आवाहनही अॅड. खरात यांनी केले आहे. आ.नारायण कुचे, बाबुराव खरात, सुरेशराव कदम, संजयराव आटोळे यांनीही नूतन पदाधिकार्यांचे अभिनंदन केले.
Leave a comment