जालना । वार्ताहर
मराठा सेवा संघ प्रणित जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदेच्या जालना जिल्हा सचिव पदी प्रा. पी. एन. खोजे यांची निवड करण्यात आली आहे. प्रा.पी.एन.खोजे हे गेल्या 25 वर्षांपासून अंकुशराव टोपे महाविद्यालयात कार्यरत आहेत.अभ्यासूपणा, चिंतनशीलता, परखडपणा, सहकार्यवृत्ती, समाभान हे त्यांच्या व्यक्तीमत्वाचे महत्त्वाचे पैलू असून अत्यंत विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत. त्यांच्या याच गुणवैशिष्ट्यामुळे मत्स्योदरी शिक्षण संस्थेने त्यांना ‘सेवा गौरव’ पुरस्काराने सन्मानित केले आहे.
त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन मराठा सेवा संघ प्रणित जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषद, महाराष्ट्र कक्षाच्या जालना जिल्हा सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. निर्मलाताई पाटील यांनी ही नियुक्ती केली असून या निवडीबद्दल सर्व स्तरातून प्रा. खोजे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
Leave a comment