जालना । वार्ताहर
महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात वैचारिक दृष्टीने (थिंक-टँक) कार्यरत असलेल्या वक्तृत्व परिषद महाराष्ट्र राज्य च्या मार्गदर्शक समितीत राज्य कार्यकारिणी प्रमुख पदी येथील युवा वक्ते, पञकार, नाट्यांकुरचे प्रकल्प प्रमुख आशीष वामनराव रसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.शिवराज आनंदकर यांनी आज मार्गदर्शक समिती ची घोषणा केली. यात आशीष रसाळ, मकरंद गिरी (लातूर) प्रमोद कुलकर्णी (अहमदनगर) यांचा समावेश आहे.
वक्तृत्व, वाद- विवाद स्पर्धा विश्वात नवीन वक्ते घडवून वैचारिक रित्या प्रगल्भ व प्रतिष्ठित परिषदेत केंद्रीय व राज्य स्तरातील लोकप्रतिनिधी, लेखक, विचारवंत, वक्ते, यांचा सहभाग असलेल्या वक्तृत्व परिषदेच्या मार्गदर्शक समितीत प्रमुख पदावर आशीष रसाळ यांना मिळालेले स्थान हे जालना जिल्ह्यासाठी गौरवास्पद आहे. दरम्यान सुञसंचालन, निवेदनात स्वतंत्र शैली असलेले आशीष रसाळ यांनी राज्य पातळीवरील स्पर्धांत जिंकलेली पारितोषिके, राज्यातील नामांकित स्पर्धांचे निष्पक्षपणे केलेले परिक्षण, नाट्यांकुर बालनाट्य संस्थेचे प्रकल्प प्रमुख म्हणून नवे कलावंत घडविण्यासाठी त्यांची तळमळ, या सर्व कार्याची दखल घेत सदर नियुक्ती करण्यात आली आहे. तथापि नवीन स्पर्धकांना प्रोत्साहन देऊन वक्ते घडविण्यासाठी मार्गदर्शक म्हणून कार्यरत रहावे. असे त्यांना दिलेल्या नियुक्ती पञात शिवराज आनंदकर यांनी नमूद केले असून या नियुक्ती बद्दल आशीष रसाळ यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
Leave a comment