जालना । वार्ताहर
जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार डेडीकेटेड कोवीड हॉस्पीटल, डेडीकेटेड कोवीड हेल्थ सेंटर, कोवीड केअर सेंटरमधील 70 रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला आहे तर जालना तालुक्यातील शेरमुलखी -2, भाग्य नगर -1, नुतन वसाहत -1, तुळजाभवानी नगर -1, शिवाजी नगर -1, जालना शहर -2, एस.आर.पी. एफ. निवासस्थान -7, घायाळनगर -1, राजपुत मोहल्ला -1, शंकर नगर -1, राऊत नगर -1, लक्ष्मी नगर -1, चंदनझिरा -3, महिला रुग्णालय -1, शनि मंदिर -1, आदर्श नगर -1, शेरे सावर नगर -1, कन्हैयानगर -1, अंकुश नगर -2, सोमदेव शेवली -1, कृष्णा नगर -1, दरेगांव -1, मंठा तालुक्यातील मंठा शहर -7,रानमळा -2, केदान वाकडी -3, बोरकिनी -1, दहा -1, खोराड सावंगी -2, नानसी पुनर्वसन -1, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी शहर -3, पिंपरखेड -4, भादली -3, मंगु जळगांव -1, जवसगांव -1, राजेटाकळी -1, कुंभार पिंपळगाव -1, अंबड तालुक्यातील नुतन वसाहत -2, अंबड शहर -1, दिशा नगरी -2, माळी गल्ली -3, शिवाजी नगर -3, जवाहर कॉलनी -2, गोंदी -2, वलखेडा -9, दहयाळ -1, बेलेगांव -1, सुतगिरणी -1, बदनापुर तालुक्यतील सोमठाणा -2, शेलगांव -3, बदनापुर तालुक्यातील बदनापुर शहर -1, अटगडे गव्हाण -2, शंकर नगर -1, जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी-3, नळविहरा -2, भोकरदन तालुक्यातील भोकरदन शहर -3, बोरगांव -1, जवखेडा -1, इतर जिल्हा शिरोडी ता. फुलंब्री जि. औरंगाबाद -1, मारोती मंदीर बीड -1, गारगुडी जि. बुलढाणा -1, मेहकर -1, सिंदखेडराजा -2, बीबी जि. बुलढाणा -2, चिखली -1, अशा प्रकारे आरटीपीसीआर तपासणीव्दारे 119 व्यक्तीचा व अँटीजेन तपासणीद्वारे 58 व्यक्तींचा अशा एकुण 177 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-12575असुन सध्या रुग्णालयात-270 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-4421, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-280, एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-42910 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-54, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-177 (टीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-6417 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-35792, रिजेक्टेड नमुने-48, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-445 एकुण प्रलंबित नमुने-599, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -3973
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-13, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-3706आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-81, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-718,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-42, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-270,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-96, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-70, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-4668, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-1548 (25 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-79190 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-165 एवढी आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात शंकरनगर जालना शहरातील येथील 45 वर्षीय महिला, पिंपरखेड ता. घनसावंगी परिसरातील 55 वर्षीय पुरुष, अंकुश नगर अंबड येथील 52 वर्षीय पुरुष अशा एकुण तीन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
Leave a comment