भाजपा पदाधिकार्यांनी व्यक्त केल्या भावना, कोणतीही माहिती न देता केली नियुक्ती
जालना । वार्ताहर
जालना जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी जालना ग्रामीणच्या दोन कार्यकारिणी जाहीर झाल्या असून आठ दिवसापूर्वी तालुकाध्यक्ष प्रकाश टकले यांनी एक तालुका कार्यकारिणी जाहीर केली त्यानंतर काल ग्रामीण तालुका अध्यक्ष म्हणून वसंत शिंदे यांनी लोकांची कार्यकारिणी जाहीर केली असून त्यातील अनेकांनी या कार्यकारिणीची आमचा काहीही संबंध नाही असे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. नामदेव साहेबराव घेम्बड, विलास निवृत्ती भुतेकर, भास्कर विष्णू कुलवंत, मधुकर माणिकराव कुरेवाड, दिलीप प्रभाकर जोशी, विलास सिताराम जाधव, दिनकर भिमराव खैरे, डॉ शरद सुभाषराव पालवे, राजेश अंबादास पालवे, एकनाथ रावसाहेब भुंबर, दत्तात्रय गोविंदराव नरवडे, गोविंदराव गाडेकर, जयंत बळवंत किनगावकर या कार्यकर्त्यांनी वसंत शिंदे यांनी जाहीर केलेल्या भारतीय जनता पार्टी जालना ग्रामीणच्या तालुका कार्यकारिनीशी आमचा काहीही संबंध नसलेल्या बाबत आज सोशल मीडियाद्वारे जाहीर केले.
जालना ग्रामीण मध्ये दोन कार्य करण्यात जाहीर झाले असून दोन गट समोरासमोर आल्याचे चित्र निर्माण झाले आहे परंतु कार्यकारिणी जाहीर करत असताना संबंधित कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता कार्यकारिणी जाहीर करणे कितपत योग्य आहे असा सवाल देखील आता भाजपच्या सर्वसामान्य मतदारांकडून केला जात आहे भारतीय जनता पार्टीची कार्यकारणी ठरवत असताना कोणत्याही कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतले गेल्यामुळे पक्षांतर्गत दुङ्गळी निर्माण झाली असून भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य कार्यकर्त्याची पार्टी आहे कार्यकारणीची निवड करताना सर्वांना विश्वासात घेऊन कार्यकारणीची निवड करणे अपेक्षित आहे त्या सर्व प्रकार आला पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्यांनी तिलांजली दिली आहे त्यामुळे ही दुङ्गळी निर्माण झाली असून यातून जिल्हा भारतीय जनता पार्टीचे प्रचंड नुकसान होणार आहे असे चित्र सध्या तरी स्पष्ट होत आहे.
Leave a comment