मंत्री अमित देशमुख, खा.राजीव सातव, आ.गोरंट्याल यांच्या कार्याचा बैठकीत गौरव
जालना । वार्ताहर
जालना जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय आणि वैद्यकीय प्रवेशासाठी 70/30 चा कोटा शासनाने रद्द केल्यामुळे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख खा. राजीव सातव आमदार कैलास गोरंट्याल आणि अन्य मान्यवरांचा अभिनंदनाचा ठराव जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी दिली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खा. राजीव सातव आमदार कैलास गोरंट्याल यांनी वैद्यकीय प्रवेशासाठी 70/30 चा असलेला कोटा रद्द करण्यात येवून विद्यार्थ्यांनी न्याय देण्यात यावा, अशी आग्राहाची मागणी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री अमीत देशमुख यांच्याकडे करण्यात आली होती. सदरील मागणी शासनाने तत्वत: मान्य केली आहे.
जिल्हा काँग्रेस कमिटीने काँग्रेसपक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे अभिनंदनाचा ठराव मंजूर करुन नुकताच पाठविला आहे. जालना जिल्हा शिक्षणाच्या बाबतीत मराठवाड्यात मागासलेला असल्यामुळे जालन्यात मेडीकल काँलेज मंजूर करण्यासाठी आमदार कैलास गोरंट्याल यांनी आग्रहाची भूमिका घेतल्याबद्दल व वैद्यकीय शिक्षण मंत्री अमीत देशमुख यांनी जालना येथे मेडीकल कॉलेजसाठी तात्परता दाखवली आहे. याबाबतीत उभय मान्यवरांचा अभिनंदनाचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला. बैठकीत याबातीत जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख यांनी प्रस्ताव मांडला तर शहर काँग्रेसचे अध्यक्ष शेख महेमूद, प्रभाकर पवार, दिनकर घेवंदे, वसंत जाधव, विजय चौधरी, राम सावंत, त्र्यंबक पाबळे, गटनेते गणेश राऊत, आदि पदाधिकार्यांनी अनुमोदन दिले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख हे होते.
Leave a comment