जालना । वार्ताहर
संत जगद्गुगुरु तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर माऊली तसेच राजे संभाजी महाराज,छत्रपती शिवाजी महाराज, या महानसंत व महापुरुष यांच्या नावाने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बिडी तयार करण्याचे कारखाने उभारून त्यांच्या नावाने उत्पादन तयार करून विक्री करीत आहेत, तसाच बिडी तयार करण्याचा कारखाना जालना येथे माऊली बिडी नावाने सुरु आहे. या कारखान्याचे मालक माऊली उबाळे हे असून आज दि.12 रोजी अखिल वारकरी संघाचे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष हभप सतीश म.जाधव (शास्त्री) यांनी माऊली उबाळे यांच्या संपर्क करून वारकरी संघातील पदाधिकार्यांना सोबत घेऊन त्यांचे कार्यालयात जाऊन भेट घेतली. यावेळी माऊली उबाळे यांनी सांगितले.
माऊली या नावाने बिडीचा कारखाना काढलेला असून, माझा हेतू ज्ञानेश्वर माऊली च्या नावाने बिडीचा कारखाना काढण्याचा नव्हता माझे नाव माऊली असल्याने त्या नावाने मी कारखाना काढला होता, या बाबत समस्त वारकरी व हिंदूंच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माङ्गी मागून मी माझ्या बिडीच्या कारखान्यास 555 असे नाव देण्याचे जाहीर करून आश्वासन दिले यावेळी हभप विष्णू म. आनंदे, हभप उद्धव म. घोगरे, हभप काशिनाथ म. आनंदे, पत्रकार भगवान साबळे, यांची उपस्थिती होती.
Leave a comment