जालना । वार्ताहर
येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. बाळासाहेब हरीभाऊ देशमुख यांची मराठा महासंघाच्या मंठा तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख आणि प्रवक्ते अशोक पा. पडुळ यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, आपण केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आपली अ.भा. मराठा महासंघाच्या मंठा तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असून आपण जिल्ह्यात, तालुक्यात शहरात मराठा महासंघाच्या शाखा स्थापन करुन समाजाचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहून छत्रपती शिवराय व मराठा हृदयसम्राट स्व. अण्णासाहेब पाटील यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचवून संघटन वाढवावे, अशी अपेक्षाही या नियुक्ती पत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
या नियुक्तीबद्दल बाळासाहेब देशमुख यांचे अॅड. शैलेश देशमुख, अॅड. सोपान शेजुळ, शुभम टेकाळे, राजू देशमुख, पृथ्वीराज भुतेकर, अनिल मदन, योगेश देशमुख, रामकिसन बोडखे, कमलेश काथवटे, दिलीप तळेकर, दत्ता सरकटे, कैलास सरकटे, महादेव खवणे, आबासाहेब राजेजाधव, गजानन देशमुख, आदींनी अभिनंदन केले आहे.
Leave a comment