प्रहार जनशक्ती पक्षाची उपविभागीय अधिकार्यांकडे तक्रार
उपविभागीय अधिकारी यांनी तक्राराची दखल घेऊन केली स्तळ पाहाणी
बदनापूर । वार्ताहर
तालुक्यातील बाजार गेवराई दुधनवाडी, सोमठाणा आदी शिवारातुन मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग जात असल्याने सदर रस्त्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असुन परिसरात सोमठाणा येथील रेणुका माता गडाच्या पायथ्याशी खदांण असुन सदर खदाणुतुन समृद्धी महामार्गाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर गैण खनिज उपसा सुरू असल्याने याच परिसरातील बाजार गेवराई शिवरात दोन स्टोनक्रेशर असुन सदर वाय.पी.डी व निलेश स्टोन केशर यांनी समृद्धी महामार्गाच्या संबंधित गुत्तेदाराने बेकायदा विक्री केलेले असुन सदर गैण खणिज विक्री केल्याची बाब प्रहार जनशक्ति पक्षाच्या लक्षात येताच त्यांनी तहसिलदार बदनापूर यांच्याकडे तक्रार केली असता तहसिलदार बदनापूर यांनी कुठलीही कारवाई संबंधितांवर केली नाही म्हणुन प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकार्यांनी तात्काळ अप्पर जिल्हाधिकारी यांच्या संपर्क साधला असता तहसीलदार बदनापूर यांनी परस्पर पंचनामे केले व तक्रार करत्याला कुठलीही पुर्व सुचना न देता केले.
यापैकी निलेश स्टोन केशर हे महसुल संबंधित तहसीलदार यांचे वाहन चालक यांचे असलेल्यांचे व तहसीलदार यांचे असल्याचा संशय असल्याचे दिनांक 08 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे. सदर निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे बदनापूर तालुका अध्यक्ष सावळाहरी शिन्दें व कल्याण गोरे यांच्या स्वाक्षर्या असुन पक़रणी उपविभागीय अधिकारी श्री संदीपान सानप यांनी याप्रकरणी दखल घेत शुक्रवारी दुपारी अंदाजे तीनच्या सुमारास बाजार गेवराई व सोमठाणा परिसरातील खाणं पट्याला भेट देत संबंधित कथीत गौण खनिज विक्री प्रकरणी प्रत्यक्ष पाहणी केली असुन संबंधितांवर काय कारवाई होणार यांची उत्सुकता बदनापूर तालुक्यातील नागरिकांना होत आहे.
Leave a comment