तहसीलदारांना निवेदन देऊन केली तात्काळ पंचनाम्याची मागणी
मंठा । वार्ताहर
राज्यातील काही गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे काही ठिकाणी चक्रीवादळाचा ङ्गटका बसला त्यामुळे शेतकर्यांची ऊस कापूस तूर केळी संत्री मोसंबी डाळिंब द्राक्ष सोयाबीन अशा विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी हतबल झाला आहे या अधिवेशनामध्ये शेतकर्यांच्या प्रश्नावर चर्चा केली जाईल याकडे महाराष्ट्रातील शेतकर्यांचे लक्ष लागले होते त्यातूनच शेतकर्यांच्या बांधावर जाऊन 50 हजार रुपये मदतीची घोषणा करण्यात आलेली होती. कोकणातील चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची नुकसान भरपाई मिळेल, विदर्भातील महापुरा मध्ये नुकसान झालेल्यांना पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळेल, कोरोना काळात छोट्या-छोट्या व्यापार्यांचे झालेल्या नुकसान बद्दल अधिवेशनात चर्चा होईल, छोट्या छोट्या व्यापार्यांना शासनाकडून विविध योजना मिळतील किंवा या किमान या काळातील त्यांचे वीजबिल माङ्ग होईल.
ज्या शेतकर्यांना किंवा ग्राहकांना वाढीव वीज बिल मिळाल आहे त्यांची वीज बिल कमी करण्यासंदर्भात घोषणा शासनाकडून होईल ज्यांना वीज मिळाली नाही त्यांना पुढील काळात मुबलक प्रमाणात वीज मिळेल अशा एक ना अनेक बाबींकडे शेतकर्यांचं महाराष्ट्रातील बारा बलुतेदार 12 कोटी जनतेची नजर होती परंतु प्रत्यक्षात मात्र हे अधिवेशन ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला‘ या म्हणीप्रमाणे नुकसान भरपाई वर महाराष्ट्र सरकार एक चकार शब्द काढायला तयार नाही त्यामुळे पावसाळी अधिवेशन हे शेतकर्यांसाठी वांझोटे ठरलं आहे अशी घणाघाती टीका माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे सततच्या पावसाने कापसा बरोबर सोयाबीनचे अगोदरच अतोनात नुकसान झालेले असताना उर्वरित पिकांना काल झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि चक्र वादळामुळे उभे पीक जमीनदोस्त झाले असून ऊस पपई कापूस मोसंबी सोयाबीन इत्यादी पिके पूर्णपणे भुईसपाट झालेली आहे या सर्व नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे. हे शेतकर्यांचे सरकार आहे असं म्हणत कुरघोडी करून महाराष्ट्रात सत्तेवर आलेले लोक शेतकर्यांच्या बाबतीत मात्र अजिबात गंभीर नसल्याचा आरोप यावेळी बबनराव लोणीकर यांनी त्याला महाराष्ट्र सरकारच्या बियाणे महामंडळाने शेतकर्यांना बोगस बियाण्यांचे वाटप केले शेतकर्यांच्या बांधावर जाऊन शेतकर्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत करू अशी घोषणा करण्यात आली या सर्व बाबी ङ्गसव्या निघालेल्या आहेत त्यातच काल परवा झालेल्या अतिवृष्टी मुळे व चक्रीवादळामुळे शेतकर्यांची पिकप पूर्णपणे भुईसपाट झालेली आहेत त्या या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश अद्याप पर्यंत शासनाने प्रशासनाला दिलेले नाहीत त्यामुळे शेतकर्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट असून वादळी वार्यासह काल झालेल्या पावसामुळे मंठा परतुर घनसावंगी जालना यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये प्रचंड नुकसान झालेले आहे ही बाब लोणीकर आणि प्रशासनाच्या लक्षात आणून दिली व तात्काळ पंचनामे करून शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी अहवाल जिल्हाधिकार्यांमार्ङ्गत महाराष्ट्र सरकारकडे पाठवण्यात यावा अशी मागणी देखील यावेळी केली. सद्यस्थितीमध्ये केवळ मूग व मिरची या दोनच पिकांचे पंचनामे करण्याबाबतचे आदेश प्रशासनाला देण्यात आले असून चक्रीवादळामुळे पूर्णपणे नुकसान झालेल्या भुईसपाट झालेल्या ऊस पपई कापूस मोसंबी सोयाबीन इत्यादी पिकांची पंचनाम्याचे आदेश मात्र अद्याप पर्यंत देण्यात आलेले नाहीत त्यात देखील कृषी विभाग संबंधित झालेले नुकसान 33 टक्के पेक्षा जास्त आहे किंवा नाही हे ठरवणार आहेत आणि त्यानंतर शेतकर्यांना नुकसान भरपाई द्यायची किंवा नाही याबाबतचा विचार होणार आहे अर्थात हातातोंडाशी आलेला शेतकर्यांचा घात वाया गेलेला आहे.
हजारो रुपयांचा खर्च शेतकर्यांनी या पिकांवर केलेला आहे आईन काढणीच्या वेळेला हे नुकसान झालेले असल्यामुळे शेतकरी प्रचंड हतबल झाला आहे त्यात कापसाचे उत्पादन पीक कापणी यावेळेला कळेल असे प्रशासकीय अधिकार्यांकडून कळत आहेत अजुन कापसाचे पीक कापणीला आलेले नाही त्यामुळे या क्षणाला तरी नेमके किती नुकसान झालं हे कळू शकत नाही त्यामुळे कापसाच्या पिकांची नुकसान भरपाई कशी द्यायची व किती द्यायची पंचनामे कसे करावेत याबाबतच्या सूचना अद्याप पर्यंत प्रशासनाला मिळालेल्या नाहीत त्यामुळे शेतकरी हतबल झालेला तर आहेत त्या बरोबरच प्रशासनातील अधिकारी देखील गोंधळून गेलेले आहेत असेही लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले. मंठा येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करत भाजपाला तहसीलदारांमार्ङ्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवले असून निवेदना मध्ये तत्काळ पंचनामे करण्यात यावे याबाबत मागणी करण्यात आली आहे यावेळी तालुकाध्यक्ष सतीशराव निर्वळ जिल्हा उपाध्यक्ष गणेशराव खवणे जि प सदस्य पंजाबराव बोराडे उपसभापती राजेश मोरे विठ्ठलराव काळे सुभाषराव राठोड विलास घोडके शंतनु काकडे माऊली गोडगे नवनाथ सट्टा कल्याण खरात नायबराव गोडगे बाळासाहेब तौर संजय राठोड पांडुरंग खरात भागवत बागल अमोल गणगे महादेव हजारे चंद्रकांत गणगे जानकीराम चव्हाण यांची उपस्थिती होती जालना तहसील समोर भाजपा युवा मोर्चा भाजपा महिला आघाडी अनुसूचित जाति मोर्चा अनुसूचित जमाती मोर्चा भटके विमुक्त आणि ओबीसी मोर्चा या सर्व आघाड्यांचे प्रमुख यांच्या उपस्थितीत तहसील समोर प्रचंड घोषणाबाजी करत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या पिकांचे तत्काळ पंचनामे करण्यात यावी याबाबतचे निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा सरचिटणीस कमलताई तुले जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शेजुळ महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष जिजाबाई जाधव युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुजित जोगस हभप रमेश महाराज वाघ संजय तौर किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकुशराव बोबडे जाति मोर्चा जिल्हाध्यक्ष शहाजी राक्षे तालुका उपाध्यक्ष दिलीपराव जोशी तालुका सरचिटणीस सहदेव मोरे पाटील सुधाकर शिंदे किसान मोर्चा तालुकाध्यक्ष भगवान भुतेकर गजानन उङ्गाड युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विक्रम उङ्गाड तालुका चिटणीस विनोद राठोड राम राठोड राजू पवार विजय घाडगे भास्कर कुलवंत जालिंदर राठोड विलास भुतेकर नारायणराव पवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
Leave a comment