कुरघोड्या करणे सोडून मदत करा लोणीकर यांचे सरकारला आवाहन

परतूर । वार्ताहर

महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टी झाली आहे काही ठिकाणी चक्रीवादळाचा ङ्गटका बसला आहे त्यामुळे शेतकर्‍यांची ऊस ,कापूस केळी, तूर, संत्री ,मोसंबी ,डाळिंब, द्राक्ष, सोयाबीन अशा विविध प्रकारच्या पिकांची प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालेला असून या अधिवेशनामध्ये शेतकर्‍यांच्या प्रश्‍नावर चर्चा केली जाईल याकडे महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची लक्ष लागले होते कोकणात झालेले चक्रीवादळ, विदर्भात आलेला महापूर ,जालना जिल्हयात काल-परवा  झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसान या सर्वांची भरपाई मिळेल अशी अपेक्षा होती मात्र सरकारने या कुठल्याही विषयाकडे गंभीरतेने न पाहता दोन दिवशी अधिवेशनाचे ङ्गलीत म्हणून नको ते उपद्य्वाप केले त्यामुळे उद्विग्न झालेला शेतकरी अधिकच गांगरून गेला असून विदर्भातील महापुरा मध्ये अनेकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे कोकणातील चक्रीवादळामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले मात्र या सरकारला शेतकरी कष्टकरी यांच्यावरून कुठलेही देणेघेणे नाही असा सवाल माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी निवेदनाद्वारे केला आहे.

पुढे या निवेदनात म्हटले आहे की  कोरोना संकटाच्या काळात छोट्या व्यवसायिकांची प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिले आकारली जात आहेत मात्र हे सरकार कुंभकर्णी झोपेत असून यांची झोप मोड करण्याची वेळ आता आली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे निसर्गाच्या अवकृपेने आणि कोरोनाच्या प्रलयामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे शेतकर्‍यांसह राज्यातील 12 कोटी जनतेची नजर सरकारकडे होती मात्र सरकारने अधिवेशनात ‘बाबाजी का ठुल्लू‘ जनतेच्या हाती दिल्याने बारा बलुतेदारा सह अठरा अलुतेदार संकटात आहे परवा झालेल्या  अतिवृष्टीमुळे राज्यासह परतूर मंठा विधानसभा मतदारसंघांमध्ये ही मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांची नुकसान झालेले आहे या नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना तात्काळ मदत करण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे शेतकर्‍यांचा कैवार घेत हे सरकार शेतकर्‍यांच्या आहे असे म्हणत परस्पर भिन्न विचार सारणी असलेल्या तीन पक्षांनी स्वार्थासाठी शेतकर्‍याला देशोधडीला लावण्याचे काम सुरू केले असल्याचे बबनराव लोणीकर यांनी निवेदनात म्हटले आहे आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं अशा प्रकारची अवस्था महाराष्ट्र राज्यात असून मराठवाड्यासह राज्यातील शेतकर्‍यांना सोयाबीनचे बोगस बियाणे बियाणे महामंडलाने शेतकर्‍यांच्या माथी मारली त्यामुळे हजारो एकर शेत जमिनीवर दुबार पेरणी करण्याची वेळ शेतकर्‍यावर आली आधीच कोरोनाचा  कहर आणि वरून राज्य सरकारच्या  असणार्‍या महामंडळाचा प्रताप यामुळे शेतकर्‍यांना आर्थिक अंधाराच्या खाईत हे सरकार ढकलत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे विद्यमान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे  शेतकर्‍यांच्या बांधावर बांधावर जाऊन हेक्टरी 50 हजार रुपये मदतीची घोषणा करतात आणि खुर्ची मिळताच विसरून जातात राज्यात भयावह परिस्थिती असून अनेकांना या कोरोना संकटाच्या काळामध्ये कधी  बेड तर कधी व्हेंटिलेटर  अभावी आपले प्राण गमवावे लागलेले आहेत स्वार्थ आणि संधिसाधूपणा यापलीकडे या सरकारची मदत नसून या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय असा सवाल निवेदनाद्वारे आमदार बबनराव लोणीकर यांनी उपस्थित केला आहे राज्यातल्या सरकारला बारा कोटी जनतेहून कुठलेही  देणे-घेणे लागत नाही त्यामुळे या सरकारच्या विरोधामध्ये आपण पुढील काळामध्ये तीव्र आंदोलनाचे हत्यार उपसणार्‍या असून सद्यस्थितीत शेतकर्‍यांच्या झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून नुकसान भरपाई द्या अशा प्रकारची मागणी निवेदन निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सद्य परिस्थितीमध्ये मूग ,मिरची या दोनच पिकांचे पंचनामे करण्याची आदेश प्रशासनाला देण्यात आलेली आहे . वादळ आणि अतिवृष्टीमुळे भुईसपाट झालेल्या ऊस ,पपई ,कापूस ,मोसंबी ,सोयाबीन तत्सम पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश अद्यापपर्यंत देण्यात आलेले नाहीत त्यामुळे सदरील सर्व पिकांचे पंचनामे तात्काळ करून शेतकर्‍यांना आर्थिक मदत करावी असेही म्हटले आहे  या वेळी उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांना निवेदन सुपूर्द करण्यात आले  या वेळी भाजपा ता अध्यक्ष रमेश भापकर, प स सभापती रंगनाथ येवले, जि प सदस्य हरिराम माने, प स सदस्य रामेश्‍वर तनपुरे, डिगांबर मूजमूले, शिवाजी पाईकराव  शहाजी राक्षें बंडू मानवतकर,नगरसेवक कृष्णा अरगडे, विश्‍वंभर शेळके राजेंद्र वायाळ महादेव शेळके यांच्यासह शेतकर्‍यांची उपस्थिती होती.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.