कायमस्वरूपी हमीभाव केंद्र सुरू करण्याची शेतकर्‍यांमधून होते मागणी

कुंभार पिंपळगाव । वार्ताहर

घनसावंगी  तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील ता. 9 बुधवार रोजी आठवडी बाजारात मुगाची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती कुंभार पिंपळगाव बाजार पेठ येथे भुसार मालाची चांगली आवक असते जालना नंतरची मुख्य बाजारपेठ म्हणून कुंभार पिंपळगावची ओळख असून 40 ते 43 गावांचा येथील बाजारपेठेत संपर्क येतो शासनाने येथे हमीभाव  केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी शेतकर्‍यांमधून जोर धरत आहे बुधवारी मुगाची चांगली आवक झाली होती व मुगाला आठवडी बाजारात चांगले भाव मिळाले. 

250  अडीचशे क्विंटल मुगाची आवक झाली 5000ते 6300  रुपये भाव मिळाला गहू 50 क्विंटल आवक झाली होती 1300 ते 1400 रू भाव मिळाला सोयाबीन 50  क्विंटल आवक झाली होती 2500 ते 3500 रुपये भाव मिळाला उडीद 10 दहा क्विंटल आवक झाली होती 5000 रू प क्विंटलला भाव मिळाला बाजरी 20 क्विंटल आवक झाली होती 800 ते 1000 रुपये भाव मिळाला तुर जुनी 20 क्विंटल आवक झाली होती 5500पाच हजार पाचशे रुपये भाव मिळाला अशी आवक झाली असल्याची  माहिती बाजार समितीच्या कडून देण्यात आली. मुग सध्या तेजीत आहे परंतु यावर्षी मुगाची प्रत चांगली नाही डागी  असलेल्या मुगाला भाव कमी मिळत आहे चांगल्या  मालाला योग्य भाव दिला जातो. नंदूभाऊ राजगुरू तीर्थपुरी व्यापारी.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.