कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी येथील ट्रांसङ्गार्मर ची दुरुस्ती करून वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी अखिल भारतीय किसान सभा लालबावटा च्या वतीने कुंभार पिंपळगाव येथील शाखा उपअभियंता यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे की राजाटाकळी येथील शितलादेवी मंदिराजवळील ट्रान्सङ्गार्मर (रोहित्र) गेल्या दोन-तीन दिवसापासून नादुरुस्त झाले आहे त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे .सध्या गर्मीचे दिवस असून लहान-लहान बालकांसह वयोवृध्दाना गर्मी असाह्य होत आहे.
काही वयोवृद्धांना श्वसनाचा त्रास आहे काही अस्थामानी त्रस्त वयोवृध्द गंभीर परिस्थिती असून दमट वातावरणामुळे एखादी दुर्घटना घडू नये नेहमीच वीजपुरवठा सुरळीत राहत नसल्याने वयोवृद्धांची दमछाक होते .त्याचा गर्मी चा त्रास होत आहे याबाबत आपण त्वरित दखल घ्यावी नसता आपल्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात येतील असा इशारा त्यांनी निवेदनातुन दिला आहे निवेदनावर जनार्दन भोरे, कुलदीप आर्दड, कृष्णा डोंगरे, बाळू आर्दड , रमेश शिंदे सह आदि संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
Leave a comment