कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड बुद्रुक येथे कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मंगळवारी तहसीलदार नरेंद्र देशमुख यांनी तातडीने भेट देऊन कोरोना बाबत परिस्थितीचा आढावा घेऊन आरोग्य विभागाला चाचणी शिबीर घेण्याच्या सुचना दिल्या होत्या ता. 9 बुधवारी आरोग्य विभागाने तातडीने पिंपरखेड येथील ग्रामस्थांना सकाळी शिबीराबाबत माहीती देऊन आरोग्य विभागाकडून हायरिस्क लोकांची चाचणी शिबिर घेण्यात आले.
येथील 25 जणांची आरटी पी शी आर टेस्ट साठी लाळेचे नमुने घेऊन प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. कुंभार पिंपळगाव प्राथमीक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपाली चव्हाण मॅडम, आरोग्य सेवक एकनाथ पोपळघट, आरोग्यसेविका अल्का वाढे, औषध निर्माण अधिकारी योगेश काटकर व गावातील अशा स्वयम सेविका यांनी शिबिराचे काम पाहिले.
Leave a comment