जालना । वार्ताहर
डिजिटलच्या माध्यमातून मनोरंजनक्षेत्रातील विविध घटकांचे प्रमोशन करण्यात आघाडीवर असलेल्या हंगामा डिजिटल मिडीया एंटरटेन्मेंट प्रा. लि.च्या वतीने हंगामा डॉट कॉम वर ‘मेरे मितवा’ हा ऑडिओ अल्बम नुकताच प्रकाशित करण्यात आला आहे. जे. पी. क्रिएशन एंटरटेन्मेंटच्या बँनरखाली ज्योती- प्रकाश यांनी या अल्बमची निर्मिती केली आहे. हिंदी चित्रपटक्षेत्रातील औरंगाबाद येथील गीतकार एम. प्रकाश यांनी या अल्बममधील गाणी लिहिली असून ख्यातनाम गायिका राधा मंगेशकर, भारती न्यायाधीश आणि ईश्वर शर्मा यांच्या आवाजात ती ध्वनीमुद्रीत करण्यात आली आहेत.
भारती न्यायाधीश या पिनाक संगीत अकादमीच्या संचालिका असून त्या माध्यमातून गायनासोबतच ‘मेरे मितवा’ या अल्बममध्ये संगीत दिग्दर्शनाचीही बाजू त्यांनी सांभाळली आहे. हिंदी भाषेतील प्रेमगीतांचा समावेश असलेल्या या अल्बममध्ये तरल, हळूवार, उत्कट, खट्याळ, विरह अशा विविध भावभावनांचे प्रगटीकरण एम. प्रकाश यांनी आपल्या गीतलेखनातून सादर केले असून त्या अनुषंगाने भारती न्यायाधीश यांनी या सर्व गाण्यांना समर्पक संगीत दिले आहे.
Leave a comment