जालना । वार्ताहर
कृषी महाविद्यालय खरपुडी येथे शंभर शिक्षक क्लब ऑफ जालनाच्या वतीने रक्तदान क्षेत्रात कार्यरत असलेले तसेच कोरोना काळात दिवसरात्र काम करणारे 20 वर्षांपासून रक्तदान क्षेत्रात समाजकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते गणेश चौधरी ब्लड डोनर ग्रुप जालनाच्या संस्थापक अध्यक्ष गणेश चौधरी यांचा सत्कार कृषिभूषण विजय अण्णा बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रसिद्द उद्योजक सुनील रायथट्टा आर.आर.जोशी सर, नाथाभाऊ घनघाव, तालुका पोलीस निरीक्षक संजय लोहकरे, संजय देठे, उपस्तीत होते. सदर सत्कार हा मोमेंटम, रोप, आणि मास्क देऊन करण्यात आले.सूत्रसंचालन जगत घुगे यांनी केले तर ह्या कार्यक्रमासाठी संदीप इंगोले यांच्या विशेष प्रयनाने हा सत्कार समारंभ पार पडला.
Leave a comment