सरचिटणीसपदी प्रा. सहदेव मोरे पाटील तर युवा मोर्चा अध्यक्षपदी विक्रम उफाड यांची निवड
जालना । वार्ताहर
माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीच्या जालना ग्रामीण कार्यकारिणी तालुकाध्यक्ष प्रकाशराव टकले यांनी आज जाहीर केली त्यामध्ये 7 उपाध्यक्ष 3 सरचिटणीस 7 चिटणीस 1 कोषाध्यक्ष 1 प्रसिद्धी प्रमुख 1 सोशल मीडिया प्रमुख तर 40 सदस्य अशी एकूण 61 लोकांची कार्यकारिणी यावेळी जाहीर करण्यात आली.
जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी दिलीप प्रभाकर जोशी, राधाकिसन रामभाऊ काटे, भागवतराव भानुदासराव जाधव, किसनराव पंडितराव शिंदे, जयश्री मुकुंद मुंडे, पुंडलिक देवराव खरात, सुनील नानाभाऊ आदमाने यांचा समावेश करण्यात आला आहे तर सरचिटणीसपदी प्रा.सहदेव मोरे पाटील, सुधाकर जगन्नाथ शिंदे, राजाभाऊ राजाराम खरात यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी जालना ग्रामीण च्या कार्यकारणी मध्ये चिटणीसपदी विनोद सिताराम राठोड रामराव किसन काळे विलास निवृत्तीराव भुतेकर संजय पंडितराव कराळे श्याम नारायण ठाकणे केशव गुलाबराव चोपडे सुरेश रमेश गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे तर कोषाध्यक्षपदी अशोक कशी पवार प्रसिद्धीप्रमुख कधी फरहान फयाज उद्दीन अंसारी सोशल मीडिया प्रमुख पदी भीमराव लिंबाजी शिंगाडे यांची निवड करण्यात आली आहे.
या कार्यकारिणी बरोबरच भारतीय जनता पार्टी जालना ग्रामीण तालुक्यातील विविध मोर्चा, आघाडी आणि सेलच्या अध्यक्षांची देखील घोषणा तालुकाध्यक्ष प्रकाश टकले यांनी पत्रकाच्या माध्यमातून केली आहे त्यामध्ये युवा मोर्चा तालुका अध्यक्षपदी विक्रम हनुमंतराव उफाड, भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्षपदी कौशल्या प्रेमसिंग जाधव, किसान मोर्चा तालुकाध्यक्षपदी भगवान सुदामराव भुतेकर, भाजपा अनुसूचित जाति मोर्चा तालुकाध्यक्षपदी संजय अंकुशराव काळे, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा तालुका अध्यक्षपदी अंबादास राधाकिसन कुरेवाड भाजपा भटके-विमुक्त आघाडी तालुकाध्यक्षपदी सोनाजी हरिभाऊ खडेकर, भाजपा उद्योग आघाडी तालुका अध्यक्षपदी गजानन लक्ष्मणराव शिंदे, भाजपा संस्कृतीक सेल तालुकाध्यक्षपदी बाबू सेवा राठोड, भाजपा कायदा सेल तालुकाध्यक्षपदी दशरथ बापूराव शिराळे, भाजपा माजी सैनिक सेल तालुका अध्यक्षपदी शिवाजी गंगाराम सानप यांची यावेळी निवड करण्यात आली
सर्वांना सोबत घेऊन पक्ष कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करू
भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष असून या पक्षात कोणताही राजकीय वारसा असण्याची गरज नाही जसे आमच्या वरिष्ठांनी आम्हा सर्वांना सोबत घेऊन पक्ष कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न केला अगदी त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा सर्वांना सोबत घेऊन पक्ष कार्य पुढे नेत राजकारणातून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आवश्यक असणारे ज्येष्ठांचे मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे असून त्यांच्या शब्दांना प्रमाण मानून सामाजिक सेवेचा वसा हाती घेणार आहोत माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर साहेब व भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल भैया लोणीकर यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचा सदैव ऋणी राहील.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment