कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसांगी तालुक्यातील अनेक भागात उसावर मिलियाबग या रोगाने चांगलाच अटॅक केला आहे परिसरातील गोदाकाठ भादली,शिवणगाव, ऊकडगाव ,पिंपरखेड ,लिंबोणी गातेगाव ,जांबसमर्थ कुंभार पिंपळगाव सह परिसरात ऊसावर मिलियाबग या पांढरी माशीचा ने रोगाचा मोठा अॅट्याक केला असून ऊसावर प्रादुर्भाव वाढत चालला असून शेतकरी आता चिंतेत दिसून येत आहे ऊसाची पाने पूर्ण पोखरून या रोगाने रसाचे शोषण करून ऊस पूर्णपणे पिवळा पडला आहे त्याची वाढ खुंटली असून यावर्षी उसाचे लागवडीचे क्षेत्र जास्त आहे शेतकरी नेहमीच अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करत असून आधीच कोरोना संसर्गाचा प्रार्दुभाव वाढतच चाललाय यामध्ये सर्वसामान्य जनता हैराण झाली असल्याने सर्वजण शेतकरी भयभीत झाले आहेत लॉक डाऊन मुळे शेतकर्यांच्या शेतीमालाला यावर्षी भाव मिळाला नाही कवडीमोल भावात विकावा लागला शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे त्यात आता हाताला आलेले भरवाशाची ऊसाचे पीक त्यावरही मिलिया बग रोगाने मोठा अटॅक केल्याने अता शेतकर्यांची चिंता वाढली आहे शेतकर्यांनी यावर्षी ऊसावर खूप मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे या रोगापासून बचावासाठी कृषी विभागाकडून योग्य उपाययोजना मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकर्यांमधून होत आहे.शेतकरी आता हतबल झाला आहे.
Leave a comment