बदनापूर । वार्ताहर
कर्नाटक येथील कन्नड रक्षक गुंडाकडून छत्रपती शिवरायांचा पुतळा एका रात्रीत काढला गेला. हा पुतळा पुन्हा सन्मानाने आहे त्या जागी विराजमान करा, अन्यथा कर्नाटकात येवून मस्ती जिरवू असा सज्जड इशारा छावा क्रांतीवीर सेनेचे शेतकरी आघाडी प्रदेशाध्यक्ष पंकज ज-हाड यांनी कर्नाटक सरकारला दिला आहे. या वेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री येदूरप्पा यांचे छायाचित्रांचे दहन करण्यात आले बदनापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. सीमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हटविला या निषेधार्थ कर्नाटकी सरकारच्या प्रतिमेचे दहन केले.
जय भवानी जय शिवाजी, कर्नाटक सरकारचा धिक्कार असो कर्नाटक शासनाची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही अशा निषेधाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी बोलताना शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पंकज जर्हाड यांनी मराठी माणसांवर होणार्या प्रत्तेक घावाचा बदला घेतला जाईल. सीमा भागातील मराठी माणसावर दडपशाही करण्याचे प्रकार होत असेल तर जशास तसे उत्तर देऊ. आमच्या आराध्य दैवतांना हात लावायची हिम्मत करू नये, अन्यथा मराठा अस्मितेचा भगवा झेंडा अटकेपार ङ्गडकवू, असा इशारा यावेळी दिला. यावेळी वाहतुक आघाडी जिल्हाध्यक्ष अर्जुन पठाडे, योगेश कडोस, गणेश कोल्हे, विलास कोल्हे, शिवा दाभाडे, अमोल जर्हाड, इमरान शेख, दिपक कैकान आदीची उपस्थिती होती.
Leave a comment