दुध उत्पादक शेतकर्यांच्या प्रश्नासाठी किसान सभेच्या वतीने निदर्शने
कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यात दूध डेअरीवर 30 रु प्रति लिटर भाव द्या,दूध पावडर आयात धोरण मागे घ्या,दूध पावडर निर्यातीसाठी प्रतिकिलो 50 रु अनुदान द्या, लोकडाऊन काळात शेतकर्यांना प्रति लिटर दुधा साठी 10 रु अनुदान थेट शेतकर्यांच्या खात्यावर जमा करा.,या व इतर मागण्यासाठी आज 1 ऑगस्ट रोजी राज्यभर किसान सभा व शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाची हाक दिली या आंदोलनास पाठिंबा म्हणून कुंभार पिंपळगाव परिसरातील राजूरकर कोठा ,राजा टाकळी, मुद्रेगाव,उक्कडगाव येथे कॉम्रेड गोविंद आर्द्ड यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.
यावेळी गोविंद आर्दड ,नामदेव तौर,जालिंदर बहिर,बालासाहेब राऊत,बाळू आर्दड,जनार्धन भोरे,बजरंग तौर,गणेश पवार,राजेभाऊ बहिर, अशोक बहिर,पंडित पवार,नारायण बहिर ,भाऊसाहेब बहिर आदी दुध उत्तपादक शेतक-यांची उपस्थितीती होती.
Leave a comment