लोकमान्य टिळकांचे विचार आत्मसात करण्याची गरज- रत्नपारखी
जालना । वार्ताहर
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे विचार खर्या अर्थाने क्रांतीकारी असून या विचारांची आज समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सेवानिवृत्त अभियंता एस.एम. कुलकर्णी यांनी येथे आयोजित कार्यक्रमात केले.
राऊ युवा प्रतिष्ठानच्यावतीने शनिवारी (दि 1) पुण्यतिथीनिमित्त येथील टाऊन हॉल परिसरात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना अभिवादन करण्यात आले. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री कुलकर्णी बोलत होते. यावेळी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष श्रीपाद रत्नपारखी, जालना पालिकेतील शिवसेनेचे गटनेते विजय पवार, करण जाधव, राजेश काजळकर, पत्रकार महेश बुलगे, महेंद्र डुरेयांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना श्री कुलकर्णी यांनी लोकमान्य टिळकांच्या विचारांना उजाळा देत टिळकांच्या विचारांची आज खर्या अर्थाने गरज असल्याचे सांगितले. तर दिवसेंदिवस युवा पिढी दिशाहीन होत असून या पिढीला योग्य दिशा देण्यासाठी प्रत्येकाने लोकमान्य टिळकांच्या विचारांना आत्मसात करण्याची गरज असल्याचे मत श्रीपाद रत्नपारखी यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थितांच्यावतीने लोकमान्य टिळकांना अभिवादन करण्यात आले.
Leave a comment