जालना । वार्ताहर
जालना शहरातील प्रयाग नगर-1, नाथबाबा गल्ली-1, गोपीकिशन नगर -1, बु-हाण नगर -1, नॅशनल नगर-4, जयभवानी नगर -1, आर.पी. रोड-3, रामनगर पोलीस कॉलनी -3, कबाडी गल्ली -1, व्यंकटेश नगर -2, मस्तगड -1, चंदनझिरा -3, भीमनगर -2, लक्कडकोट -1, नळगल्ली -1, नयाबाजार -1, दर्गा वेस -2, कन्हैयानगर -6, सामान्य रुग्णालय परिसरातील -1, टाऊन हॉल -1, भाग्यनगर -1, मोदीखाना -1, बालाजी नगर -1,कचेरी रोड -1, प्रशांतीनगर -1, गुडला गल्ली -1, जालना शहर -2, कोष्टी गल्ली काद्राबाद -1, अंबड -1, वरुड बु. -1, बुटखेडा -4, अशा एकुण 52 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला तर जालना शहरातील मंठा चौफुली-4, फारशी गल्ली -1, नुतन वसाहत-2, हनुमान नगर-2, युसुफ कॉलनी -1, लक्ष्मीनारायणपुरा-1, भाग्यनगर -3, जमुना नगर -5, सोरटीनगर-1, सकलेचा नगर-3, वैभव कॉलनी -3, समर्थ बँकेजवळ-2, पावरलुम जुना जालना-3, काद्राबाद -1, एम.आर.डी.सी. -1, सामान्य रुग्णालय निवासस्थान -1, महाकाळा ता. अंबड -11, रोहीलागड-1, शहागड -3, सुखापुरी -1, देऊळगाव राजा -1, उज्जैनपुरी ता. बदनापुर -1, निरखेडा-1, रांजणी-1, शनी मंदीर परतुर -1 अशा एकुण 54 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह तर अँटीजेन तपासणीद्वारे 28 अशा एकुण 82 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-7495 असुन सध्या रुग्णालयात-484 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-2854, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-170 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-13447 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने-50, दैनिक पॉझिटीव्ह नमुने-82 (टीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-2269 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-10868, रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-440 एकुण प्रलंबित नमुने-221, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या -2382.
14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती-56, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती-2349, आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-00 सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-496,विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत-60, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती-484,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-102,दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-52, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या-1506, सध्या कोरोना क्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या-691 (18 संदर्भीत रुग्णांसह) पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या-24233 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या-72 एवढी आहे. अंबड शहरातील रहिवाशी असलेल्या 70 वर्षीय पुरुष रुग्णास न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि. 27 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना दि. 28 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि. 31 जुलै 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाला. यावलपिंप्री ता. घनसावंगी रहिवाशी असलेल्या 70 वर्षीय पुरुष रुग्णास न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि. 27 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना दि. 28 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांचा 1 ऑगस्ट 2020 रोजी त्यांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
Leave a comment