जालना । वार्ताहर
भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री आ.बबनरावजी लोणीकर, जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे, जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे, शहराध्यक्ष राजेश राऊत यांच्यामध्ये झालेल्या बैठकीत व विचारविनीमय करुन जालना शहराचे भाजपा शहर व शहरातील विविध आघाडी व सेल च्या प्रमुखांच्या नियुक्ती भाजपा जालना कार्यालयात जाहीर करण्यात आली.
अखंड हिंदुस्थानचे कवचकुंडल हिंदुर्हदय सम्राट विकासपुरुष मा.पंतप्रधान श्री.नरेंद्रभाई मोदी यांचे विचार घराघरात पोहचवून जालना शहरात भारतीय जनता पार्टीचे संघठण वाढवावे असे पदाधिकार्यांना दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे.जालना शहर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे शहराध्यक्ष राजेश राऊत,उपाध्यक्ष राजेंद्र भोसले, बाबुराव भवर, श्रीकांत शेलगांवकर,सौ.ममता कोंडयाल, सरचिटणीस शिवराज जाधव, प्रा.डॉ.दिलीप अर्जुने,चिटणीस सुहास मुंढे,दिनेश व्यास, सौ.सखुबाई पणबिसरे, राजेश शर्मा, सौ.स्विटी दायमा,महादेव कावळे, कोषाध्यक्ष नरेश जैस्वाल, सोशल मिडीया प्रमुख सुनिल पवार, शहर प्रसिध्दीप्रमुख नागेश बेनीवाल, कार्यालयमंत्री शांतीलाल राऊत,भाजपा महीला मोर्चा शहराध्यक्ष सौ.सिमा बिर्ला, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष सुनिल खरे, भाजपा अल्पसंख्याक मोर्चा शहराध्यक्ष चेतन देसरडा,अनुसूचित जाती मोर्चा (एस.सी) शहराध्यक्ष महेंद्र अकोले, भाजपा अनुसूचीत जमाती मोर्चा (एस.टी) शहराध्यक्ष दुर्गेश कुरील,भाजपा किसान मोर्चा शहराध्यक्ष प्रशांत गाडे, भाजपा कामगार आघाडीसेल शहराध्यक्ष सोमनाथ गायकवाड, भाजपा भटक्या विमुक्त सेल शहराध्यक्ष मुकेश राठोड,भाजपा उदयोग सेल शहराध्यक्ष संजय अग्रवाल, भाजपा अपंग सेल शहराध्यक्ष अशोक बरकसे,भाजपा झोपडपटटी सेल शहराध्यक्ष पंकज भुरेवाल, भाजपा कायदा सेल शहराध्यक्ष ड. लक्ष्मण उढाण, भाजपा उत्तर आघाडी सेल शहराध्यक्ष अशोक मिश्रा,भाजपा दक्षीण भारतीय सेल शहराध्यक्ष गणेश जल्लेवार, भाजपा व्यापार आघाडी सेल शहराध्यक्ष रामप्रसाद मुदडा, भाजपा जेष्ठ कार्यकर्ता सेल शहराध्यक्ष प्रभुलालजी गोमतीवाले, भाजपा सहकार सेल शहराध्यक्ष अॅड. अनिल संचेती, भाजपा प्रज्ञा सेल शहराध्यक्ष डॉ. परीक्षीत देशपांडे, भाजपा मच्छीमार सेल शहराध्यक्ष सुरज पणबिसरे, भाजपा शिक्षक सेल शहराध्यक्ष अतुल हेलसकर, भाजपा आर्थिक फायन्स सेल शहराध्यक्ष अर्जुन गेही, भाजपा सांस्कृतीक सेल शहराध्यक्ष सौ.अंजली नागोरी, भाजपा ट्रान्सपोर्ट सेल शहराध्यक्ष अलोक शहा,भाजपा अध्यात्मिक समन्वय शहराध्यक्ष बबन उजेड, भाजपा सोशल मिडीया सेल शहराध्यक्ष सुनिल पवार आदीची नियुक्ती करण्यात आली.
सदर जालना शहरातील पदाधिकार्याची नियुक्ती केंद्रीय राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री आ.बबनरावजी लोणीकर,जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे, जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव पाटील दानवे, शहराध्यक्ष राजेश राऊत, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशोक पांगारकर, माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे,माजी शहराध्यक्ष सिध्दीविनायक मुळे, जिल्हा उपाध्यक्ष विरेंद्र धोका, जिल्हा उपाध्यक्ष धनराज काबलिये, जिल्हा उपाध्यक्ष सतिष जाधव, अल्पसंख्याक उपाध्यक्ष अतिक खान,माजी नगराध्यक्ष चंपालाल भगत, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख बाबासाहेब कोलते, नगरसेवक शशीकांत घुगे, महेश निकम, सुनिल राठी,सुनिल पवार, सौ.संध्या देठे, कपिल दहेकर,नवनाथ जोगदंड, सुभाष सले, अमरदिप शिंदे, सोमेश काबलिये, डॉ.प्रशांत आढावे, विवेक पाटील, सोपान पेंढारकर, रोहीत नलावडे आदीची शहरातील पदाधिकार्याची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जालना शहरातील भाजपाच्या शहर कार्यकारिणी शहरातील भाजपा मोर्चा व आघाडी सेल ची कार्यकारिणी व प्रमुखांची निवड करण्यात आल्याचे भाजपा जिल्हा प्रसिध्दीप्रमुख बाबासाहेब कोलते यांनी एका पत्रान्वये कळविले आहे.
Leave a comment