भोकरदन । वार्ताहर
दुध उत्पादक शेतकायांना प्रति लिटर 10 रु. अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे, दुध भुक्टीच्या निर्यातीसाठी प्रति किलो 50 रु. अनुदान दयावे व गाईच्या दुधाला प्रति लिटर 30 रु. हमीभाव दयावे या दुध उत्पादकांच्या मागण्यासाठी भारतीय जनता पार्टी तालुका भोकरदन यांच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष आ.संतोष पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली तहसिल कार्यालय भोकरदन येथे शनिवार दि. 01/08/2020 रोजी धरणे आंदोलन करुन तहसिदार संतोष गोरड यांना सामुहिक निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलतांना आ.संतोष पाटील दानवे म्हणाले की, दुध उत्पादकांच्या विविध मागण्यासाठी 21 जुलै 2020 रोजी राज्यव्यापी आंदोलन करुन मा.मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु राज्य सरकारने दुध उत्पादकांच्या मागण्यांची दखल न घेतल्याने दुध उत्पादक शेतकायांना मोठया आर्थिक संकटाला तोंड दयावे लागत आहे. ग्रामीण भागातील शेतकायांसाठी दुग्ध व्यवसाय हा शेतीस जोडधंदा म्हणुन अत्यंत महत्वाचा व्यवसाय आहे. शेतीचे खरीप व रब्बी हंगामाचे उत्पादन दर सहा महिण्याला मिळत असल्यामुळे हा शेतीमाल विकल्या शिवाय शेतकायांच्या हातात पैसा येत नाही. परंतु दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातुन सकाळ-संध्याकाळ शासकीय दुधसंकलन केंद्रावर दुधाची विक्री करुन तसेच स्थानिक नागरीकांना दुधाचा रतीब घालुन शेतकायांना त्यातुन मिळणााया नगद पैशातुन त्यांच्या संसाराचा दैनंदिन खर्च भगवता येत असतो. परंतु कोरोणा संक्रमणाच्या पाश्वभुमीवर संपूर्ण देशात विविध टप्यांवर लॉकडाऊन घोषीत करण्यात आल्यामुळे हॉटेल, मिठाईचे दुकाने, लग्नकार्य व विविध सामाजिक उपक्रम बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटुन त्याचा दुग्ध व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. त्यातच शासकीय दुध खरेदीचे दर 16-17 रुपये प्रती लिटर पर्यंत घसरल्याने दुध उत्पादक आडचणीत आले आहे. परंतु दुध उत्पादकांच्या समस्यांकडे पाहण्यास राज्यातील आघाडी सरकारला वेळ नसुन राज्य सरकारचे दुध उत्पादकांच्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज राज्यव्यापी महाएल्गार आंदोलन छेडण्यात आले आहे. आजचे आंदोलन हे अहिंसक मार्गाने शांततेत पार पडले असले तरी दुध उत्पादकांच्या समस्यांवर राज्यशासनाने योग्य तो विचार करुन वेळीच उपाययोजना न केल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्य शासनाच्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशार या निवेदनाच्या माध्यमातुन राज्य शासनास देण्यात येत आहे.
यावेळी जि.प. जालना मा. अध्यक्ष तुकाराम पा.जाधव, जि.प.सदस्या सौ.आशाताई मुकेश पांडे पाटील, मा.नगराध्यक्षा सौ.आशाताई माळी, भाजपा तालुका अध्यक्ष राजेंद्र देशमुख, पंचायत समिती सभापती सौ.वैशालीताई विनोंद गावंडे, पं.स.उपसभापती सौ.यशोदाबाई सुखलाल बोडखे, कृ.उ.बा.स. चे सभापती कौतीकराव पा.जगताप, मा.सभापती परमेश्वर पा. लोखंडे, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष मुकेशभाऊ चिने, भाजपा शहराध्यक्ष सतिषबापु रोकडे, भाजयुमो चे तालुका अध्यक्ष दिपक पा.जाधव, भाजपा तालुका उपाध्यक्ष विजय पा.कड, कृ.उ.बा.स चे संचालक, सांडु पा. वाघ, कृ.उ.बा.स. चे संचालक गणेश पा. ठाले, जि.प.सदस्य विठ्ठलराव चिंचपुरे, जि.प.सदस्य, चंद्रकांत साबळे, मा.जि.प.सदस्य रामेश्वर सोनवणे, पं.स.सदस्य, कैलास पा.गव्हाड, कैलास सहाणे, भगवानराव रावळकर, ऋषिकेष पगारे, कल्याणराव जाधव, मा.उपसभापती गजानन नागवे, मा.नगरसेवक पंढरीनाथ खरात, राजेश जोशी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकत्यांची उपस्थिती होती.
Leave a comment