दुधाला योग्य भाव द्या नसता रस्त्यावर दुधाचे टँकर उतरू देणार नाही-राहुल लोणीकर

परतूर । वार्ताहर

दूध उत्पादकांवर राज्य सरकार अन्याय करत असून लॉकडाऊन मध्ये दुधाची मागणी कमी झाल्याने दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे हॉटेल व्यवसाय सह दुधासी संबधीत इतर व्यावसायिकांकडून दुधाची खरेदी थांबल्याने दुधाचे भाव सोळा ते सतरा रुपयापर्यंत घसरले असून दूध उत्पादकांचा खर्चही वसूल होत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे राज्य सरकारने 25 रुपये लिटर प्रमाणे दूध खरेदी करण्याची घोषणा केली होती मात्र ती देखील फसवी ठरली आहे त्यातच राज्यसरकार ठराविक दूध संघाकडून शासनाची दूध खरेदी करत आहे परिणामी राज्यभरातील अन्य दूध उत्पादकांवर अन्याय होत आहे अशा स्थितीत दूध उत्पादकांना प्रति लिटर दहा रुपये अनुदान थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे व दुधाच्या भुकटीच्या निर्यातीसाठी प्रति किलो 50 रुपये अनुदान देण्यात यावे त्याचप्रमाणे गायीच्या दुधाला तीस रुपये दर देण्यात यावा या मागणीसाठी भारतीय जनता पार्टी, रयत क्रांती, रिपब्लिकन पक्ष (आठवले गट), राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम महायुतीच्या वतीने  भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वात  परतूर येथील महादेव मंदिर चौकात आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलतांना राहुल लोणीकर म्हणाले की,तिघाडी सरकार ला शेतकर्‍यांहुन काही घेणे नसून सत्ते साठी उद्धव ठाकरे व मंडळी फक्त खुर्च्या साभाळण्यात मस्कगुल असल्याचे सांगतानाच दूध उत्पादक शेतकरया ना न्याय न मिळाल्यास दुधा चा एक ही टँकर रस्त्यावर फिरू देणार नसल्या चे ते म्हणाले राज्य सरकार च्या नाकर्तेपणा मूळे दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून भाजपा व महायुती हे खपवून घेणार नसून उद्धव ठाकरे सरकार च्या विरोधात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. पुढे बोलताना ते म्हणाले की कोरोना संकटात राज्यातील जनता होरपळून निघाली असून सरकार मात्र या बाबतीत कुठलीच उपाय योजना न करता फक्त केंद्रा कडे बोट दाखवत आहे. एक छदाम ही राज्यसरकार ने दिलेला नसून उद्धव ठाकरे हे रिमोट वर चालणारे खेळणे आहेत  कोरोना संकटात राज्यातील जनतेला वार्‍या वर सोडून ठाकरे फक्त घटक पक्षाची मर्जी सांभाळण्याचे काम करत असून, सरकार ने दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नाची गंभीरतेने दखल न घेतल्यास शेतकर्‍यांना न्याय मिळवून दिल्या शिवाय आपण गप्प बसणार नसल्याचे  ते म्हणाले. सरकारने दूध उत्पादकांच्या मागण्यांची दखल न घेतल्याने आज संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करण्यात येत आहे हे आंदोलन पूर्णपणे अहिंसक पद्धतीने केले जात असून सोशल डिस्टंसिंगचे पालन यामध्ये करण्यात येत आहे यावेळी कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांच्या सह रमेश भापकर ,गजानन राजबिंडे ,सिद्धेश्वर लहाने ,शिवाजी तरवटे,  सुनील खरात भगवानराव मोरे,  दया काटे  संपत टकले  सभापती, रंगनाथ येवले  रामप्रसाद थोरात,  रामेश्वर तनपुरे  कृष्णा अरगडे,  शिवाजी पाईकराव  शत्रुघ्न कणसे, संतोष हिवाळे, राजेंद्र मुंदडा मुन्ना चित्तोडा, किशोर कदरे, नामदेव गोरे, रोहिदास टिप्परकर  गणेश कदम, यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.