परतूर । वार्ताहर
परतूर नगरपालिकेत महापुरुषाच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करताना, पुन्हा एकदा मान्यवर अधिकारी व पदाधिकारी यांच्या अनुपस्थितीची पुनरावृत्ती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने पहायला मिळाली. परतूर नगरपालिकेत महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करताना पालिकेच्या मान्यवरांची नेहमीच अनुपस्थिती आढळून येते, जयंती व पुण्यतिथी ला जर सार्वजनिक सुट्टी असेल तर तेव्हा तर महापुरुषांना अभिवादन केले जाते की नाही असा प्रश्न पडतो. अभिवादन करण्यासाठी नगरपालिकेत होणारा कार्यक्रमाचे कोणाला विशेषतः प्रमुख अधिकारी व पदाधिकारी यांना गांभीर्य रहात नाही असेच दिसते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा हे दृश्य समोर आले. अण्णाभाऊ साठे जयंती नगरपालिकेत शनिवारी साजरी केली गेली त्यावेळी लोकप्रतिनिधी पैकी केवळ एकमेव नगरसेवक अंकुश तेलगड उपस्थित होते, तर जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यात नेहमीच पुढाकार घेणारे कर्मचारी रामचंद्र पानवाले , विजय सपकाळ व शिवाजी गुंजमुर्ती एवढ्यांचीच म्हणजे मोजून चार जनांचीच उपस्थिती होती. अण्णाभाऊ साठे यांच्याच नाही तर इतर महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी ला ही असेच दृश्य पहायला मिळत आलेले आहे. शनिवारी ईद निमित्ताने सुट्टी होती. नगरपालिका सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महत्वाच्या कार्यालयात महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी ला खरंतर नगराध्यक्ष, मुख्याधिकारी,उपाध्यक्ष, विरोधीपक्ष नेते,नगरसेवक, नगरसेविका ,समितीचे पदाधिकारी यांची उपस्थिती लक्षणीय असायला हवी पण कोरोना मुळे मोठी संख्या जरी नसली तरी कार्यक्रमशोभेल अशी उपस्थिती का रहात नाही असा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे.
Leave a comment