मुंबई - कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वेगाने वाढत आहे. त्यामुळे मुंबईत कोरोना विषाणूचा फैलाव वेगाने वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई महानगरपालिकेने कोरोनाबाधित रुग्ण आढळलेले 140 रहिवासी भाग सील केले आहेत. दरम्यान, अशाच प्रकारची कारवाई नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली येथेही करण्यात आली आहे.

गेल्या दोन दिवसात मुंबई आणि आसपासच्या परिसरात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडले आहेत. त्यामुळे या रुग्णांचे वास्तव्य असलेल्या परिसरात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. काल वरळी कोळीवाडा येथील परिसरात कोरोनाचे काही संशयित सापडल्यानंतर हा परिसर सील करण्यात आला होता. तर गोरेगावमधील बिंबिसारनगर हा परिसरसुध्दा कोरोनाचे दोन रुग्ण सापडल्यानंतर लॉक करण्यात आला होता. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत सुमारे 140 रहिवासी भाग सील करण्यात आले आहेत.

मुंबईप्रमाणेच ठाणे, डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरार या शहरातील काही भागसुद्धा सील करण्यात आले आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.