नवी दिल्ली |

कोरोना व्हायरसच्या संकटामुळे अनेक कंपन्या चीनमधून बाहेर पडू शकतात. ही आपल्यासाठी संधी आहे. राज्यांनी ही गुंतवणूक आपल्याक़डे आकर्षित करण्याचा प्रयत्न करावा, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सवरुन विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर संवाद साधला. करोना व्हायरसची सध्याची स्थिती, लॉकडाउन या मुद्दांबरोबरच चिनी गुंतवणूकीसंदर्भातही या बैठकीत चर्चा झाली. यावेळी मोदी बोलत होते.

चीनमधून बाहेर पडणाऱ्या कंपन्यांची गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यांनी सज्ज रहावं. पुरेसे कुशल मनुष्यबळ आणि पायाभूत सोयी-सुविधामुळे भारतामध्ये चीनला पर्याय ठरण्याची क्षमता आहे, असं मोदी म्हणाले आहेत.

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे अनेक कंपन्या चीनच्या पलीकडे पर्याय शोधत आहेत. ही गुंतवणूक राज्यांमध्ये आणण्यासाठी आपण सर्वांनी मिळून व्यापक रणनितीवर एकत्र काम केले पाहिजे, असं मोदी मुख्यमंत्र्यांना म्हणाले आहेत.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.