बीड । वार्ताहर
उन्हाची तीव्रता वाढत असतानाच आता प्रकल्पीय पाणीसाठा आटु लागला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात पाणीसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असला तरी आष्टी तालुक्यात ग्रामिण व शहरी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सद्यस्थितीत आष्टी तालुक्यात 18 तर आष्टी नगर पंचायत विभागात 13 असे एकूण 32 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
जिल्ह्यात गतवर्षी शेवटच्या टप्प्यात समाधानकारक पाऊस पडला होता त्यामुळे आता एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत आष्टी वगळता अन्य भागात टँकर सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आलेली नाही. दरम्यान आष्टी तालुक्यात एकूण 57 हजार 428 नागरीकांची तहान भागवण्यासाठी 32 टँकर सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये ग्रामिण भागातील 11 गावे व 6 वाड्यांमधील 35 हजार 259 नागरींकासाठी 18 टँकर दररोज 43 खेपा पाण्याच्या करत आहेत. तसेच आष्टी नगर पंचायत क्षेत्रातील 20 हजार लोकांची तहान भागवण्यासाठी 13 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. याबरोबरच धारूर तालुक्यातील एक गाव एक वाडीतील 2 हजार 169 लोकांसाठी पाण्याचे एक टँकर 3 खेपा करत आहेत, अन्य भागात सध्या तरी टँकर सुरू नाहीत.
Leave a comment