आष्टी : प्रतिनिधी
गेल्या पंधरा दिवसांपासून कडा आणि परिसरात अनेकांना बिबट्याचे दर्शन झाले आहे .टाकळी,शेरी बु, कडा याठिकाणी बिबट्याचे दर्शन झाले असल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.कड्यात सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास नगर बीड हायवेवर मारुती मंदिरा समोरून नलावडे यांच्या चिकूच्या बागेत बिबट्या जाताना नागरिकांनी पाहिल्याने खळबळ उडाली आहे.
गेल्या महिन्यामध्ये आष्टी तालुक्यातील शिरापूर येथील काही लोकांनी शेतामध्ये बिबटया पाहिला होता .त्यानंतर जवळ असणाऱ्या टाकळी परिसरामध्ये ही आठ दिवसांच्या फरकाने पुन्हा बिबट्या नागरिकांना दिसला. सतत कोणाच्या ना कोणाच्या नजरेत हा बिबट्या येत असल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे एक मात्र खरे गेल्या पंधरा दिवसांपासून दिसत जरी असला तरी त्याने आणखीनही जीवितहानी केलेले दिसून आली नाही.याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सकाळी त्या भागाची पाहणी केली असून ठसे घेतले आहेत
Leave a comment