अंबाजोगाई । वार्ताहर
संचारबंदी काळात गरजूंना व ज्यांचे हातावर पोट आहे असे समाज घटक यांना मदत व्हावी,दिलासा मिळावा याच विधायक भूमिकेतून येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष व ज्येष्ठ नेते वसंतराव मोरे यांनी रविवार, दिनांक 26 एप्रिल रोजी मोरेवाडी येथील 200 गरजू कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप केले.
अंबाजोगाई तालुक्यातील मोरेवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच वसंतराव मोरे यांच्या हस्ते मोरेवाडी गावातील 200 गरजू कुटुंबांना किराणा साहित्याचे वाटप केले.यावेळी गरजूंना गहू,साखर,तुरदाळ, रवा,चहापत्ती आणि अंगाचे साबण या जीवनावश्यक वस्तूंच्या किराणा साहित्य कीट्सचे वाटप करण्यात आले आहे. वसंतराव मोरे हे सामाजिक कार्यांत सातत्याने पुढाकार घेतात.काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात. मोरेवाडीचे सरपंच असताना त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासतात केलेली विविध विकासकामे मोरेवाडीकर अद्यापही विसरलेले नाहीत.कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर गरजूंना मदत करण्याचे कार्य करून मोरे यांनी नव्या पिढी समोर चांगला आदर्श ठेवला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात असलेल्या ’लॉकडाऊन’ मुळे हातावर पोट असलेल्या मजुरी,रोजंदारी करणा-या कामगारांचे हाल होत असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.अशा कुटुंबांना मोरे कुटुंबियांनी मदतीचा हात दिला आहे. मोरे आबा यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वञ स्वागत होत आहे.मोरेवाडीतील हातावर पोट असणा-या,मोलमजुरी करणा-या ज्यात नाभिक,सफाई कामगार, बारा बलुतेदार समाज बांधव,अनुसूचित जाती व जमाती समाज बांधव,घरकाम करणा-या महिला भगिनी व गरजूंना जीवनावश्यक किराणा साहित्याचे वाटप ’सोशल डिस्टन्स’ पाळून,मास्क बांधून व रितसर यादी तयार करून घरपोहोच करण्यात आले आहे.यावेळी माजी सरपंच वसंतराव मोरे,शिवानंद मोरे, अप्पासाहेब मोरे,चंद्रकांत मोरे,पांडुरंग पांचाळ,संजय वाघमारे,शंकरराव कांबळे आदी मोजक्याच मान्यवरांची उपस्थिती होती.तर जीवनावश्यक वस्तूंच्या घरपोहोच वाटपासाठी ज्ञानेश्वर मोरे, इंद्रजित मोरे, विकास मोरे,रवि भनगे, राजपाल मोरे,किरण मोरे,भागवत मोरे, बालाजी मोरे, संदीप मोरे,श्रीकांत मोरे, सुजीत धावरे,कैलास सवने,शुभम वाघमारे,बुद्धभुषण भडके,विशाल कांबळे, प्रशांत शिंदे,राजू काळे यांचे सहकार्य लाभले.
Leave a comment