नांदूरघाट । वार्ताहर
केज तालुक्यातील नांदूरघाट येथे निरंतर अन्नछत्राच्या माध्यमातून पत्रकार मंच व राजे प्रतिष्ठान यांच्या वतीने कोरोना संसर्जन्य विषानुच्या पार्श्वभूमीवर गरजू गोरगरिबांना लोकापर्यंत मदतीचा हात पोहोचत आहेत. कोरोणाच्या या महासंकटाला हरवण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता आपण समाजाचे काही देणे लागतो या उद्देशाने प्रेरित होऊन पत्रकार मंच व राजे प्रतिष्ठान यांनी अन्नछत्राचे आयोजन ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष श्रीकांत राजे जाधव यांनी व त्यांच्या टीमने केले.
यासाठी प्रल्हाद देशमुख,उषा शिंदे. गणेश गोंद्रे. मनोज देशमुख, शिवाजी जाधव. हुसेन सय्यद, पत्रकार जयदत्त गायकवाड, राजेभाऊ हांडगे, बिभीषण वाघ,जावेद शेख, मुईज शेख अनिश शेख यांनी पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत सुमारे 448 लोकापर्यंत ही मदत दिलेली आहे. तर तीनशे साडेतीनशे लोकांचा जीवनावश्यक वस्तूंचा साठा अन्नछत्राला शिल्लक आहे. या अन्नछत्राला दानशूर लोकांची खूप मोठी मदत मिळत आहे. देशाची सेवा अशा कार्यामधून होते असे अन्नछत्राचे आयोजक पत्रकार श्रीकांत जाधव यांनी सांगितले.
Leave a comment