अंबाजोगाई । वार्ताहर

चनई परिसरात राहणा-या व जन्मताच दिव्यांग (100 टक्के अंध) असलेल्या तरुणास लॉकडाऊन मुळे खाण्यासाठी काहीही नाही असे सामाजिक कार्यकर्ते दिनेश घोडके यांना समजले त्यांनी ही माहिती शिक्षक-मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार यांना सांगितली.असता रापतवार सरांनी तात्काळ शिक्षक-मैत्री प्रतिष्ठानतर्फे गव्हाचे पीठ,तांदूळ, साखर,तुरदाळ,तेल अशा प्रकारचे जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असलेले अन्नधान्याचे एक कीट देऊन त्यांची मदत केली.माणुसकी जोपासली.अन्नधान्याचे कीट देताना शिक्षक-मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार,सचिव उमेश नाईक, तालुका क्रीडा समन्वयक दत्ता देवकते,राजीव गांधी पंचायतीराज संघटनचे मराठवाडा अध्यक्ष राणा चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते अजीम जरगर,दिनेश घोडके हे उपस्थित होते.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.