खरीप नियोजनाबरोबरच पाणीटंचाई व करोनाच्या पार्श्वभूमीवरील उपाययोजनांवर चर्चा

बीड । वार्ताहर

करोनाच्या संकटाच्या सावटाखाली ही बैठक होते आहे यातून आपण येणार्‍या कृषी खरीप हंगामाचे खरीप नियोजन करतो आहे यामध्ये खरीप हंगामाची कृषी विषयक तयारी करताना आपण सर्व प्रमुख बाबींचा विचार केला असून जिल्ह्यातील ऊस तोड कामगार व मजुरांना हाताला काम देण्यासाठी मनरेगातून कामे सुरू करण्याचे निर्देश राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री  तथा  जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले .
सोमवारी (दि.27) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रगती सभागृहात खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठकीचे आयोजन केले होते .या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन पालकमंत्री श्री मुंडे बोलत होते यावेळी सभागृहात आमदार सुरेश धस, आ. संदीप सीरसागर ,आ. विनायक मेटे तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हा परिषद अध्यक्ष शिवकन्या शिरसाट, आमदार प्रकाश सोळुंके ,बाळासाहेब आजबे ,लक्ष्मण पवार , संजय दौंड आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.याच बरोबर जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय सरग यासह विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.यावेळी खरीप हंगामाच्या नियोजना बरोबरच कोरोनाच्या संकटात शासनाच्या विविध विभागांच्या वतीने करण्यात येणार्‍या उपाययोजनांबाबत ही चर्चा झाली तसेच मागील हंगामातील पिक विमा व कृषी वीजपुरवठा योजनेतील अडचणी देखील चर्चा करण्यात आले.यावेळी पालकमंत्री मुंडे म्हणाले, जिल्ह्यात करण्यात येणार्‍या उपाययोजनांमध्ये जनतेच्या व शेतकर्‍यांच्या दृष्टीने बैठकीमध्ये सर्व आमदार महोदयांनी सुचविलेल्या सूचनांचा देखील समावेश झाला आहे ज्या विषयांना जिल्हास्तरावर निर्णय घेणे शक्य आहे ते सर्व तातडीने मार्गी लावले जात आहेत. कृषी हंगामासाठी जिल्ह्यामध्ये सोयाबीन या प्रमुख पिकाच्या साठी उपलब्ध बियाणे अपुरे पडू नये यासाठी वाढीव 80 हजार क्विंटल बिल बियाणे उपलब्ध करून दिले जातील याचबरोबर कृषी निविष्ठा खते कीटकनाशके यांची गुणवत्ता व उपलब्धता शेतकर्‍यांना रहावे यासाठी भरारी पथके नेमून नियंत्रण राखले जाईल.सध्याच्या कापूस खरेदी प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यासाठी आपण तातडीन वरिष्ठ पातळीवर  पाठपुरावा करणार असून तूर व हरभरा खरेदी लगेच जिल्ह्यात सुरू केली जाईल यासाठी निर्देश दिले आहेत पिक विमा बाबतचा काही अडचणी निदर्शनास आणल्या गेल्या आहेत प्रशासनाने याबाबत संबंधित विमा कंपनी वर गुन्हा दाखल केलेला आहे. उर्वरित दुसर्‍या कंपनीत 13 पर्यंतची मुदत देण्यात येत असून त्यांनी त्यांच्याकडे दाखल विमा प्रस्तावांची भरपाई देण्याबाबत कार्यवाही करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत यासाठी कृषी व महसूल विभागाने अतिवृष्टी बाबत केलेले पंचनामे ग्राह्य धरले जावेत याबाबत राज्य पातळीवर झालेला निर्णय देखील संबंधित विमा कंपनीस सांगण्यात आला आहे त्यांनी मुदतीत कार्यवाही नाही केल्यास जिल्हाधिकार्‍यांनी त्याबाबत पुढील कारवाई करावी असे पालकमंत्री मुंडे म्हणाले. स्वस्त धान्य दुकानातील धान्याचे वितरण पारदर्शक पद्धतीने व्हावे यासाठी देण्यात येणार्‍या द्या रेशन दुकानदाराबरोबरच तेथे नियुक्त समन्वय अधिकार्‍यास कडे देतील दिल्या जातील असे पालकमंत्री मुंडे म्हणाले. 
यंत्रणांनी युद्धस्तरावर काम करावे-जिल्हाधिकारी 
जिल्हाधिकारी रेखावार यांनी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करीत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली .कृषी निविष्ठांची दुकाने तपासण्यासाठी संबंधित यंत्रणांनी युद्धस्तरावर काम करावे. खरीप हंगामात देखील प्रकल्पातील पाण्याद्वारे सिंचन करण्याची निर्णय मान्सून लांबल्यास स्वतंत्र बैठक घेऊन घेता येईल असे त्यांनी सांगितले.काही गावांना विशेष चा शिरूर तालुका तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा नसल्याने उपस्थित केलेल्या प्रश्नांचे बाबत त्या गावांमध्ये संबंधित बँकांची ग्राहक सेवा केंद्रे सुरु करून ग्रामस्थांची सोय केली जाईल असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले
बैठकीत लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेले विविध मुद्दे
आमदार सोळुंके यांनी जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पिक विमा योजनेतील प्रश्न वीज पुरवठ्यासाठी एचपीडिएस योजना तील अडचणी मांडल्या.आमदार क्षीरसागर यांनी बीड तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांची संख्या पाहता कापूस खरेदी केंद्रांची संख्या वाढवणे गरजेचे असल्याचे नमूद केले आमदार आजबे यांनी तूर व हरभरा खरेदीतील अडथळे दूर करून तातडीने खरेदी सुरू होण्यासाठी मागणी केलीआमदार मेटे यांनी लॉकडाऊन मधील रोजंदारीवरील व्यक्तींच्या समस्या मांडताना रिक्षा चालक हमाल या यांच्यासाठी सहानुभूतीने काम होण्याची गरज व्यक्त केली  आमदार धस यांनी आष्टी पाटोदा तालुक्यात पाणीटंचाईमुळे उपाययोजनांची मागणी करताना शेतकर्‍यांच्या समस्या देखील सांगितले त्याच बरोबर राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा काही भागात नसल्याने नागरिकांना अडचणीत सामोरे जावे लागते हे सांगितले.आमदार दौंड यांनी अंबाजोगाई तालुक्यातील एचपी डी एस योजनेच्या अंबलबजावणी बाबत खरीप हंगामासाठी बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत व पोखरा योजनेतील कार्यवाहीबाबत विषय मांडले. आमदारपवार यांनी गेवराई शहराचा पाणी प्रश्न बाबत सुरू असलेल्या कामांची माहिती देऊन एपीएल रेशन कार्ड धारकांना येणार्‍या अडचणींची माहिती दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती शिरसाठ यांनी पीक कर्जाबाबत मुद्दे मांडून पिक विमा व बियाणे याबाबत विचार व्यक्त केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री निकम यांनी सादरीकरण केले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.