बीड -
कोरोना संशयीतांसाठी सुरु करण्यात आलेल्या जिल्हा रुग्णालयत व अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालयात आज शनिवारी (दि.4) सकाळी एकुण चार रुग्ण दाखल झाले. चौघांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.
यामध्ये जिल्हा रुग्णालयात 1 तर अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये 3 रुग्णांचा समावेश आहे. या चौघांचेही स्वॅब प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेे आहेत. दरम्यान आतापर्यंत जिल्हा रुग्णालयातील 35 तर स्वारातीमधील 21 अशा एकुण 56 जणांचे स्वॅब प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. हे सर्व कोराना निगेटिव्ह आलेले आहेत.
Leave a comment