बीड । वार्ताहर

कोरोना विषाणूचा सामुदायिक संसर्ग टाळण्याकरिता 24 मार्चपासून लॉकडाउन तसेच संचारबंदी असल्यामुळे हातगाडीवर किरकोळ खाद्यपदार्थ विकणारे जिल्ह्यातील तब्बल साडेतीन ते चार हजार किरकोळ खाद्यपदार्थ व्यावसायिकांची दिवसाची सरासरी 80 लाख ते एक कोटी रुपयांची दैनंदिन उलाढाल ठप्प झाली आहे. या किरकोळ खाद्यपदार्थ विक्री करणार्‍यांवर या कालावधीत उपासमारीची वेळ आली आहे.

शहरात किरकोळ खाद्यपदार्थ विक्री करणाजया या व्यावसायिकांची समोसा, कचोरी, रगडा पेटीस, आलू पुरी, दहीवडा तसेच आलूवडा विक्रीची रस्त्यावर दुकाने आहेत. अशाच प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाड्या, छोटेखानी हॉटेलही शहरात मोठ्या प्रमाणात आहेत. यासोबतच ग्रामीण भागातील प्रत्येक गावात तसेच मोठ्या खेड्यांमध्येही खाद्यपदार्थ विक्री करणार्‍यांची संख्या चांगलीच असल्याने त्यांची दुकाने लॉकडाउन’मुळे बंद करण्यात आली आहेत.त्यामुळे किरकोळ खाद्यपदार्थ विक्री करणाजया या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली असून, त्यांनी दुसरे रोजंदारीची कामे सुरू केली आहेत. शहरात फुटपाथवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाजयांची संख्या यामध्ये अधिक आहे. सदर व्यवसायातून मिळणार्‍या उत्पन्नाच्या भरवशावर हजारो व्यावसायिकांचा उदरनिर्वाह चालत असल्याचे सांगण्यात आले, मात्र लॉकडाउनपासून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. किरकोळ व्यावसायिकांमध्ये कुणाला बँकेची, बचत गटाची तसेच मायक्रो फायनान्सच्या कर्जाची किस्त भरायची आहे. अशाच प्रकारे मुलीचे लग्न, मुला-मुलीच्या शाळेचे शुल्क भरण्याची चिंता सतावत आहे. एलआयसी पॉलिसीचा हप्ता भरायचा बाकी असून, तर तातडीची वैद्यकीय सेवा घ्यावी लागते. अनेक किरकोळ व्यावसायिक भाड्याच्या घरात राहतात. त्यांच्यापुढे भाडे चुकविण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. 

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.