मुंबई । वार्ताहर
राज्या-राज्यातील परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्र्याशी व्हिसीद्वारे संवाद साधला. यामध्ये ज्या राज्यात कोरोनाचे जास्त रूग्ण आहेत अशा राज्याचे लॉकडाऊन वाढवण्याचा विचार राज्य सरकारच करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आगामी काळात राज्य सरकारने आप-आपल्या राज्यामध्ये योग्य ती खबरदारी घ्यावी अशी सुचना केली आहे. गेल्या आठवड्यातच केंद्र सरकारचे विशेष आरोग्य पथक प्रत्येक राज्यात जावून आढावा घेऊन आले आहेत. त्यानुसारही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक मुख्यमंत्र्यांना सुचना केली आहे. राज्यात मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरांमध्ये कोरोना व्हायरसचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे इतर सहा राज्याबरोबर महाराष्ट्रातही लॉकडाऊन वाढणार असल्याचे संकेत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी यापुर्वीच 3 मे नंतर काय करायचे ते ठरवू असे म्हणत लॉकडाऊन वाढण्याचे संकेत दिलेच होते. राज्यासह दिल्ली, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब आणि ओडिसा या राज्यामध्ये लॉकडाऊन वाढणार आहे.
महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांनी लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढवण्याची मागणी केली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत दिले आहेत. राज्यातील 92 टक्के करोना रुग्ण केवळ मुंबई-पुण्याचे आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये 18 मेपर्यंत लॉकडाऊन सुरू राहावेत, अशी टोपे यांची मागणी आहे. परंतु, यावर पंतप्रधान मोदींशी चर्चेनंतर निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Leave a comment